Shop

Saleनवी पुस्तके

सव्यसाची | Savyasachi

320.00

स्वातंत्र्य लढ्याची राजकीय पार्श्वभूमी असलेली सव्यसाची ही कादंबरी म्हणजे शरद साहित्याचे सर्वोच्च शिखर आहे. नरहर कुरुंदकरांनी या भव्य कादंबरीचे भरभरून कौतुक केले आहे. कलकत्त्याचे त्या वेळचे पोलीस कमिशनर शरच्चंद्रांना म्हणाले होते, “शरद बाबू, कुठेही आम्ही क्रांतिकारकांना पकडल्यावर त्यांच्याकडे दोन पुस्तकं सापडतात, गीता आणि सव्यसाची. या कादंबरीने क्रांतिकारकांना वेड लावलं आहे.”
क्रांती व स्वातंत्र्याच्या भव्य स्वप्नाने भारावलेला तिचा साहसी नायक सव्यसाची कोणत्या क्रांतिकारकावरून घेतला आहे, याविषयी अनेक तर्क केले जातात.
रासबिहारी बोस, अरविंद घोष, सुभाषचंद्र बोस वगैरेंची नावे येतात. पण यातील कोणी एक नव्हे तर या सर्वांच्या व्यक्तिमत्त्वांची वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये एकत्र झाल्यासारखी वाटतात.

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 3-4 | Shrikant Bhag 3-4

320.00

श्रीकांत हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

Saleनवी पुस्तके

श्रीकांत भाग 1-2 | Shrikant Bhag 1-2

280.00

श्रीकांत हे नोबेल विजेता साहित्यिक रोमां रोलांचे अत्यंत आवडते पुस्तक होते. ही एक प्रकारची भ्रमणगाथा आहे आणि हे भ्रमण करताना त्याला दिसलेल्या समाजाचे व जीवनाचे दर्शन श्रीकांत घडवतो. गो. नी. दांडेकरांच्या कुण्या एकाची भ्रमणगाथावर याची दाट छाया जाणवते, पण तिथे श्रीकांतमधले अपूर्व व्यक्तिदर्शन नाही व एवढा विशाल पटही नाही. एक प्रकारे हे शरद बाबूंचे आत्मचरित्र आहे. त्यांची भटकण्याची वृत्ती, ब्रह्मदेशातली नोकरी, विचारसरणी, जातिभेदांविषयी तिरस्कार, पारतंत्र्याचा तिटकारा, सहृदय स्वभाव, पण त्याचबरोबर अन्यायाचा प्रतिकार करण्याचे धारिष्ट, मनातली एक प्रकारची उदासीनता हे सर्व ‘आवारा मसीहा’चे जगणे श्रीकांत आणि शरदबाबू या दोघांच्यात समान दिसते.

Saleनवी पुस्तके

संन्याशाच्या डायरीतून | Sanyashachya Diarytun

320.00

स्वामीजींचे महत्त्व वाढण्यास, त्यांना प्रभावशाली नेते बनण्यास इतिहासाने खरोखरच नाट्यपूर्ण प्रसंग व संधी उपलब्ध करून दिली. हैद्राबाद संस्थानात एकीकडे असलेली अनिर्बंध सरंजामशाही व दुसरीकडे असलेले कमालीचे दारिद्र्य व मागासलेपण यांच्यामधील परस्पर क्रिया-प्रतिक्रियांतून शोषण मात्र निःसंकोचपणे बोकाळले होते. जमीनधारणेचा प्रश्न प्रामुख्याने सर्वांपुढे उभा होता. त्या प्रश्नावरून ग्रामीण भागात चोहोकडे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. रझाकार दल, कम्युनिस्ट, सरंजामी वतनदार, समाजकंटक आणि नफेखोर या सर्वांनी मिळून धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बराच काळपर्यंत पृथ्वीवर नरक निर्माण केला होता.

अकनूर, मचलपल्ली येथील भीषण घटना आणि त्यांसारख्या अन्यत्रही लक्षावधी मूक जनतेवर चाललेल्या अत्याचारांमुळे मोठी स्फोटक परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे अतिरेकी विचाराच्या मंडळींना आपल्या दृष्टीने या परिस्थितीचा लाभ करून घेण्यास एक संधी मिळाली. प्रश्न मुख्यतः सामाजिक व आर्थिक स्वरूपाचा होता. अर्थात त्यात जातीय व राजनैतिक प्रश्नांचाही गुंता होताच. हे दुखणे नाहीसे करण्यासाठी मोठ्या स्वरूपाची व थोडीशी किचकट अशी शस्त्रक्रिया करणे अवश्य होते. ती शस्त्रक्रिया आपल्या वैशिष्ट्यपूर्ण ध्येयनिष्ठेने व चिकाटीने स्वामीजींनी केली.

…पी. व्ही. नरसिंह राव (प्रस्तावनेतून)

भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank

50.00

क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.

Saleनवी पुस्तके

समाज, राजकारण, कला | Samaj, Rajkaran, Kala

320.00

1931 ते 2012 असे 80 वर्षांचे आयुष्य लाभलेले राम बापट अर्धशतकाहून अधिक काळ सार्वजनिक जीवनात सक्रिय होते. त्यांची ओळख प्रामुख्याने, पुणे विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि सामाजिक व राजकीय संस्था-संघटनांचे खंबीर पाठीराखे अशी होती. पण त्यांना इतिहास, समाजशास्त्र, मानव्य शास्त्र, तत्त्वज्ञान इत्यादी विषयांत असलेली गती थक्क करणारी होती. शिवाय, साहित्य, नाटक, सिनेमा यांचे ते साक्षेपी समीक्षक होते. त्यामुळे व्हर्सटाइल जिनियस असे त्यांच्याबाबत म्हणता येते. त्यांच्या स्मृतीनिमित्त, 2013 ते 2023 या दशकभरात दरवर्षी एक याप्रमाणे व्याख्याने आयोजित करण्याचे काम मकरंद साठे व गजानन परांजपे या दोघांनी हाती घेतले व पार पाडले. त्या व्याख्यानमालेत देशभरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना निमंत्रित केले गेले. अभ्यासपूर्ण व मर्मग्राही अशी ती व्याख्याने इंग्रजीतून झाली. त्या व्याख्यानांचे अनुवाद व संपादन करून तयार केलेले हे पुस्तक आहे.

Saleनवी पुस्तके

आत्मकथा | Aatmakatha

560.00

1922 ते 1995 असे जवळपास 73 वर्षांचे आयुष्य मधु लिमये यांना लाभले. त्यांनी वयाच्या 16 व्या वर्षी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला आणि 1982 पर्यंत ते सक्रिय राजकारणात राहिले. ‘चले जाव’ चळवळ, ‘गोवा मुक्ती संग्राम’ आणि ‘राष्ट्रीय आणीबाणी’ या तिन्ही प्रसंगी त्यांनी तुरुंगवास भोगला. समाजवादी पक्षाचे नेते म्हणून ते तरुणपणापासून वावरले. महाराष्ट्रातच जडणघडण झालेली असूनही बिहारमधून चार वेळा लोकसभेवर निवडून गेले, उत्तम संसदपटू अशी त्यांची ख्याती राहिली. अखेरची 12 वर्षे त्यांनी राजकारणाचे भाष्यकार आणि लेखक या भूमिका पार पाडल्या. त्यांच्या नावावर लहान-मोठी अशी चार डझन (हिंदी व इंग्रजी) पुस्तके आहेत.
अशा या मधु लिमये यांनी वयाच्या पंचविशीपर्यंतचे म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाले तोपर्यंतचे लिहिलेले आत्मकथन म्हणजे हे पुस्तक आहे.
यातून त्यांची बालकुमार वयातील व तारुण्यातील झंझावाती वाटचाल तर दिसतेच, पण स्वातंत्र्यपूर्व पाव शतकातील भारतीय समाजजीवनाची विहंगम दृश्येही पाहायला मिळतात. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर चार दशकांतील त्यांची तेजस्वी वाटचाल आणि भारताचे वादळी राजकारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक पायाभूत ठरेल.

सुनीलकुमार लवटे यांची मुलाखत | Sunilkumar Lawate Yanchi Mulakhat

70.00

1901 ते 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे सार्वजनिक आयुष्य सात दशकांचे होते. त्या काळात त्यांनी केलेल्या विपुल व विविधांगी लेखनाचे संकलन व संपादन करण्याचे काम डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी 2019 मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने हाती घेतले आणि पुढील पाच वर्षे पूर्ण वेळ सातत्याने व चिकाटीने कार्यरत राहून पूर्ण केले.
त्यातून आकाराला आलेला प्रकल्प म्हणजे ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी समग्र वाङ्मय’.
तब्बल दहा हजार पानांचा हा प्रकल्प महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने एकूण 18 खंडांमध्ये प्रकाशित केला आहे. त्या निमित्ताने, डॉ. लवटे यांची दोन भागांतील दीर्घ व्हिडिओ मुलाखत साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांनी घेतली, त्या मुलाखतीचे शब्दांकन असलेली ही पुस्तिका आहे.

1 2 3 30