माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
₹100.00माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
1971 ला भारत-पाकिस्तान युद्ध झाले, त्याला बांगलादेश मुक्तिसंग्रामाची पार्श्वभूमी होती. ते युद्ध संपल्यावर ग. प्र. प्रधान यांनी बांगला भूमीत जाऊन तेथील सैनिक व नागरिक यांच्याशी संवाद करून जो रिपोर्ताज लिहिला, त्याचे पुस्तक म्हणजे सोनार बांगला!
मन, मनाचे व्यवहार, मानसिक आजारांची, लक्षणे, कारणे आणि उपाय यांवर काही वर्षांपूर्वी डॉ. हमीद दाभोलकर या मनोविकार तज्ज्ञासोबत, मी आणि राजू इनामदार यांनी ‘मनोविकार संवाद कार्यशाळा’ घेतली. त्यात आम्ही संवादाच्या विविध पद्धतींवर काम केले. विविध आजारांची माहिती लोकांना देण्याकरता पोस्टर, घोषवाक्य, गाणी आणि नाटक यांचा प्रभावी वापर कसा करता येईल याचा विचार केला. त्यात घुसळण होऊन अचूक शास्त्रीय माहिती ही कलात्मक संवादी पद्धतीने देण्याचे मार्ग आम्हाला दिसले. त्यातील एक मार्ग म्हणजे Community Theatre सुरू करून लोकांशी संवाद साधणे हा होता. नाटक करताना करणारे आणि बघणारे या दोघांचेही शिक्षण होते. विचारांची बीजे दृक्-श्राव्य रूपातून खोलवर रुजतात. जिवंत अनुभव हा प्रभावशाली असतो. हे सर्व लक्षात घेऊन ‘मानसरंग नाट्यमहोत्सव’ भरवावा असे ठरले. तीन वर्षे ते महोत्सव भरले. त्या संपूर्ण प्रक्रियेची झलक दाखवणारी ही पुस्तिका आहे.
या सर्व युवांच्या लेखनातून व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य या चार घटकांचे प्रतिबिंब दिसेल.
आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.
अनुक्रम
१. आणि मी ‘श्यामची आई’ पडद्यावर साकारली… – गौरी देशपांडे
२. पुणे ते ऑस्ट्रेलिया व्हाया टीव्ही मीडिया – हर्षदा स्वकुळ
३. हमदर्द विद्यापीठाकडून, उम्मीद अकेडमी कडे – वली रहमानी
४. ‘ऑड मॅन’ चा प्रवास नाशिक ते न्यूयॉर्क- धैर्य दंड
५. सिलीकॉन व्हॅली. टितोडी आणि किस्सान जीपीटी- प्रतीक देसाई
नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येक वेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची, बुद्धीची, क्षमतांची.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.