Shop

एक्स्प्रेस पुराण | Express puran

160.00

उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.

1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.

या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.

Shastriji | शास्त्रीजी

160.00

‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.

अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

   

टॉलस्टॉय यांच्याशी पत्रसंवाद | Tolstoy Yanchyashi Patrasanwad

120.00
आपणास जगातून अनेक जण पत्रं लिहीत असत आणि आपण सर्व पत्रांची दखल घेऊन, बऱ्याच पत्रांना उत्तरे लिहीत होतात. हे माहीत असल्यामुळेच मी आपणास काही पत्रं लिहिणार आहे. आपल्या उदात्त जीवनाशी माझा जो भावबंध आहे, त्यामुळेच मला हे करावेसे वाटते. या पत्रांमुळे हा भावबंध अधिक दृढ होईल आणि माझ्या जीवनाच्या या संध्यासमयी तो मला मोठा आधार वाटेल.

         

 

आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृत्तं | Aath Prathamik Shikshakanchi Aatmvrutta

120.00
आठ प्राथमिक शिक्षकांची आत्मवृतं (कार्यकथन) – ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांतील आठ शिक्षकांनी आपल्या शाळांच्या शैक्षणिक वाटचालीवर टाकलेला दृष्टिक्षेप.

     

साने गुरुजींची जीवनगाथा | Sane Gurujinchi Jeevangatha

640.00

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हेच आहे.

     

लाटा लहरी | Lata Lahari

80.00
लाटा लहरी (संवादचित्रे) – 25 वर्षांच्या आतबाहेरचे वय असलेल्या सहा तरुण मित्रांचे विविध विषयांच्या निमित्ताने झडलेले मार्मिक वादसंवाद.

     

थर्ड अँगल | Third Angle

70.00
थर्ड अँगल (भाष्यचित्रे) – प्रॅक्टिकल क्लबमध्ये एक थिअरॉटिकल मित्र नियमितपणे येतो आणि प्रॅक्टिकल मित्रांसमोर भाषणे देऊन जातो, त्यातील निवडक 12 भाषणे.

     

वाचता वाचता । Vachata Vachata

320.00

गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.

            

1 2 3 4 30