Saleनवी पुस्तके

280.00

व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti

शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.

Share

Meet The Author

तर असे दुर्मिळ गुणविशेष असलेले आठ व्यक्तिविमर्श या पुस्तकात आहेत : दुर्गाबाई भागवत, गोविंदराव तळवलकर, म. द. हातकणंगलेकर, स्वामी अग्निवेश, वि. म. दांडेकर, शरद जोशी, हमीद दलवाई, अ. भि. शहा… हे आठही जण विविध क्षेत्रांत उत्तुंग कर्तबगारी गाजवणारे होते. या व्यक्तींची वैचारिक जडण-घडण, सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक भूमिका, कार्यपद्धती आणि प्रभाव यांचे सहृदय ऑडिट या पुस्तकात वाचायला मिळते. या व्यक्तींचा वेध घेणे हेच मुळात प्रचंड गुंतागुंतीचे व आव्हानात्मक आहे. मात्र हर्डीकरांनी ते आव्हान या पुस्तकात असे पेलले आहे की, पुस्तक वाचून झाल्यावर अचंबा वाटतो; त्या आठही व्यक्तींच्या विचार कार्याचा आणि हर्डीकरांच्या लेखनपद्धतीचाही !

Weight 0.25 kg
Dimensions 14 × 1.8 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti”

Your email address will not be published.