आपल्या लोकशाही प्रेरणांचा विचार केला तर सव्वाशे वर्षं आणि औपचारिक लोकशाही व्यवहारांचा विचार केला तर सहा दशकं एवढा काळ लोकशाहीचा इथे वावर आहे. त्यामुळे या सर्व अनुभवांत अधिक-उणे असणार; काही लाभ झाले असणार, तर काही तोटे सहन करावे लागत असणार. म्हणून लोकशाहीची हिशेब-तपासणी करण्याचा हा प्रयत्न आहे. राजकारण आणि राजकीय व्यवहार हे खलनायक नाहीत आणि राजकीय व्यवहार हा आपल्या सार्वजनिक जीवनाचा एक अपरिहार्य घटक आहे, या भूमिकेतून या लेखसंग्रहामध्ये राजकारण नावाच्या अवकाशातून काय हाती लागतं आणि आणखी काय आपण मिळवू शकलो असतो पण ते जमलं नाही, याची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.
Reviews
There are no reviews yet.