धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद जोपर्यंत स्वतःला सुसंस्कृत आणि विचार समृद्ध बनवत नाही आणि समाजातील वंचित जातींच्या समाजातील जागृतीला आपल्या अंगी मुरवत, तिचे रुपांतर क्रांतिकारक शक्तीत करत नाही, तोपर्यंत हिंदू संप्रदायिक विचारांच्या वाढत्या उधाणाला रोखणे हे अवघड आहे. हिंदू कडवेपणाला आणि मुस्लिम मूलतत्ववादाला रोखू शकेल असा एक मार्ग म्हणजे मुस्लिम समाजाचे जीवन धर्मनिरपेक्ष बनविणे. मुसलमान नेत्यांनी जर आपल्या समाजाच्या शैक्षणिक आणि आर्थिक गरजांवर लक्ष केंद्रित केले. आणि समाजाला विकासभिमुख केले. तसेच त्यांच्या अलगतेवर जोर दिला नाही तर केवळ मुस्लिम मूलतत्ववाद ओसरेल, एवढेच नव्हे तर हिंदू संप्रदायिक प्रचारकांच्या खातात्यातील बहुतेक अस्त्रे निकामी होतील.
Janma Bigar-Congress vadacha : Vol. 1 & Vol. 2 | जन्म बिगर-कॉंग्रेसवादाचा : खंड 1 आणि खंड 2
₹500.00खंड 1
भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या पहिल्या अठ्ठावीस वर्षांच्या (१९४७ ते १९७५) अत्यंत महत्त्वाच्या अशा कालखंडाचा समग्र राजकीय इतिहास सदर ग्रंथात दस्तावेजांसह ग्रथित झाला आहे. या काळात राजकारणावर जवाहरलाल नेहरू प्रणित आणि नंतर इंदिरा प्रणित काँग्रेस पक्षाचे वर्चस्व होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत सर्व पक्ष, विशेषतः सोशलिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष, जोमाने उतरले होते परंतु त्यांच्या पदरी निराशाच पडली. पुढल्या दशकात सत्ताधारी काँग्रेसबाबत कोणती भूमिका घ्यावी ? मर्यादित सहकार्याची की कट्टर विरोधाची ? या दुविधेत सोशालिस्ट आणि कम्युनिस्ट पक्ष अडकले. त्या काळात धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या पक्षांना नाममात्र जनाधार होता.
प्रमुख आणि प्रज्ञावंत राजकीय नेते या नात्याने मधु लिमये या काळात सक्रिय होते. भाषावार प्रांतरचना आणि प्रादेशिक अस्मिता हे मद्दे ऐरणीवर आणून विरोधी पक्षांनी काँग्रेसला आव्हान दिले. जयप्रकाश नेहरू चर्चा, सोशलिस्ट पक्षातील फाटाफूट, राममनोहर लोहियांच्या नव्या पक्षाची स्थापना, प्रसोपा आणि संसोपा यांच्यातील दुरावा, जयप्रकाशांचा राजकीय संन्यास आणि लोहियांबरोबरचे मतभेद इत्यादी बाबींचा सखोल परामर्श लिमये घेतात. चीनच्या आक्रमणानंतर सर्व बिगर काँग्रेस पक्षांची मोट बांधून १९६७ ची सार्वत्रिक निवडणूक लढविण्याची व्यूहरचना लोहियांनी केली, त्यातून उत्तर भारतात काँग्रेस पराभूत झाली. पण राज्याराज्यांमधली संयुक्त विधायक दलांची सरकारे राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांच्या तत्त्वशून्य सत्तालालसेपायी गडगडली. या काळाचा हा इत्थंभूत इतिहास.
खंड 2
स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या ३० वर्षात भारताच्या राजकारणावर १९४७ ते १९६४ या काळात जवाहरलाल नेहरूंचे आणि नंतरच्या दशकात म्हणजे १९७७ पर्यंत इंदिरा गांधींचे वर्चस्व होते. समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्ष हे प्रमुख विरोधी पक्ष असले तरी त्यांचा प्रभाव मर्यादित होता. धर्माधिष्ठीत राजकारण करणाऱ्या जनसंघ, मुस्लिम लीग, अकाली दल यांची शक्तीही नाममात्र होती. १९६२ मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर भारताला पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाला वळण देण्यासाठी आणि काँग्रेसची सत्तेवरची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्व बिगर काँग्रेसवादी पक्षांची संयुक्त आघाडी करण्याची कल्पना राममनोहर लोहियांना सुचली. त्याचे फलित काय आणि त्या प्रक्रियेत काय गुंतागुंत होती, हे त्या कालखंडातले प्रमुख राजकीय नेते मधु लिमये यांनी या पुस्तकात लिहिले आहे. पहिला खंड वाचकांच्या हाती अगोदरच पडला आहे.
सदर खंडात इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षात घडवून आणलेली पहिली फूट, स्वतंत्र पक्ष / जनसंघ / कम्युनिस्ट पक्ष यांची देशाच्या राजकारणातली भूमिका आणि स्थान, सत्तेच्या केंद्रीकरणासाठी इंदिरा गांधींनी वापरलेले नीतिभ्रष्ट मार्ग, बिहार आणि गुजरात आंदोलन आणि जयप्रकाशांचे दिग्विजयी पुनरागमन, विरोधी पक्षांच्या ऐक्यासाठी त्यांनी चालवलेले प्रयत्न इत्यादी बाबींचे तपशीलवार विश्लेषण आहे.
लोहियांनी मांडलेल्या कल्पनेचे राजकारणाच्या धकाधकीत तीनतेरा वाजले असले, तरी तेच सूत्र घेऊन जयप्रकाशांनी इंदिरा गांधींना कसे आव्हान दिले, याचा आढावा लिमये घेतात आणि १९७५ च्या आणीबाणीपाशी हे इतिहास कथन आणून थांबवतात.
Reviews
There are no reviews yet.