कूळ, जात, वर्ण, धर्म, जन्मस्थान वा देश याविषयी व्यक्तीला वाटणारे प्रेम वा निष्ठा जन्मदत्त स्वरूपाच्या असतात, त्या जन्माने मिळतात. याउलट न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, नीती व लोकशाही या मूल्यांविषयीच्या निष्ठा प्रयत्नपूर्वक आत्मसात कराव्या लागतात. जन्मदत्त निष्ठा बलवत्तर दिसल्या तरी कालांतराने त्या दुबळ्या होतात आणि समाज प्रगल्भ मूल्यनिष्ठांकडे जातो. जन्मदत्त निष्ठांकडून मूल्यनिष्ठांकडे जाणे याचेच नाव प्रबोधन आहे व तेच समाजाचे खरे उन्नयनही आहे. ‘युगांतर’ मध्ये या स्थित्यंतराचा विस्तृत आढावा प्रमाणांसह घेतला आहे.
Sale
₹250.00 ₹200.00
₹250.00 ₹200.00
₹175.00 ₹140.00
₹300.00 ₹240.00
₹125.00 ₹100.00
₹250.00 ₹200.00
₹175.00 ₹140.00
₹350.00 ₹280.00
₹250.00 ₹200.00
₹300.00 ₹240.00
₹200.00 ₹160.00
₹175.00 ₹140.00
Yugantar | युगांतर
युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.
Meet The Author
Tarangan | तारांगण
तारांगण (व्यक्तिचित्रे) – यदुनाथ थत्ते, अनंत भालेराव, बाबा आमटे, भिंद्रानवाले, सुरेश भट इत्यादी १२ व्यक्तींवरील ललितरम्य व विचारगम्य लेख.
Koham | कोsहम
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.
Manvantar | मन्वंतर
मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Tujhyasave Tujhyavina | तुझ्यासवे तुझ्याविना
‘तरुण भारत मध्ये असताना मी संघाचा नव्हतो, लोकमत मध्ये राहून मी काँग्रेसचा झालो नाही आणि ‘लोकसत्ता’त असतानाही मी संचालकांची तरफदारी कधी केली नाही. पदे सोडली, संघटना सोडल्या, एकटे राहणे पसंत केले अन् त्यासाठी प्रत्येक पावलागणिक तसे राहण्याची किंमत चुकवत राहिलो. किमतीहून मूल्य मोठे असते, असे तूही म्हणायचीस. माझ्या तशा निर्णयांच्या मागे दर वेळी तू उभी राहिलीस.
Ekaki | एकाकी
एकाकीपण ही केवळ मानसिकता असते काय ? की, ते त्याहून खरे व मुलभूत वास्तव असते ? माणसांना आधार लागतो. तो असला तरी त्यांना कुणी तरी सोबत व हाताशी आहे असे वाटते. तो आधार असला वा गेला तर त्याच्या वाट्याला येते ते एकाकीपण जरा वेगळे असले, तरी तशा एकूणच एकाकी मानसिकतेचा तो भाग असतो.
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 128 |
Be the first to review “Yugantar | युगांतर” Cancel reply
Related products
जवाहरलाल नेहरू | Jawaharlal Nehru
जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी स्वातंत्र्य हा जुन्या मार्गाचा शेवट नव्हता, नव्या वाटेचा आरंभ होता. त्याआधीचा त्यांचा व देशाचा प्रवास एका प्रदीर्घ व अंधाऱ्या वाटेवरील कष्टाचा, वेदनांचा व विजयाचा होता. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी साध्य नव्हते, ते भविष्याच्या उभारणीचे साधन होते. आयुष्याची 27 वर्षे त्यांनी स्वातंत्र्यलढ्याच्या धकाधकीत, तर त्यातली 10 वर्षे तुरुंगात (एकूण सात वेळा मिळून) काढली होती. ते डिसेंबर 1921 मध्ये प्रथम तुरुंगात गेले. त्यांचा अखेरचा तुरुंगवास 9 ऑगस्ट 1942 रोजी सुरू झाला, तो 1041 दिवसांचा होता. अखेरच्या कारावासानंतर दोन वर्षांनी ते देशाचे पंतप्रधान झाले आणि 16 वर्षे त्या पदावर राहिले. त्या काळात त्यांनी देशाच्या आधुनिकतेची, लोकशाही वाटचालीची व सर्वक्षेत्रिय प्रगतीची पायाभरणी केली. अशा या नेत्याचे चरित्र समजून घेतले पाहिजे, कारण एका मर्यादित अर्थाने ते देशाचेही चरित्र असते.
Mahatma Gandhinchi Vicharsrushti | महात्मा गांधींची विचारसृष्टी
महात्मा गांधींची विचारसृष्टी – काही अलक्षित पैलू (लेखसंग्रह) – गांधींविषयी खूप काही लिहले गेले आहे, पण त्यातूनही फार लक्ष गेले नाही असे काही पैलू दाखवणारे पुस्तक.
व्यक्ती आणि व्याप्ती | Vyakti Ani Vyapti
शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.
Lokshahicha Kaivari | लोकशाहीचा कैवारी
लोकशाहीचा कैवारी (चरित्र) – उत्कृष्ठ संसदपटू व समाजवादी नेते अशी ओळख असलेल्या बॅरिस्टर नाथ पै यांचे राजकीय, सामाजिक जीवन त्यांच्या मित्राने रेखाटले आहे.
Bharat Ani Bhartache Shejari | भारत आणि भारताचे शेजारी
भारत आणि भारताचे शेजारी (लेखसंग्रह) – पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार, चीन, श्रीलंका, मालदीव या शेजारी राष्ट्रांच्या राज्यव्यवस्थांविषयी अभ्यासकांनी लिहिलेले लेख.
मुलांसाठी विवेकानंद | Mulansathi Vivekanand
एक अनाम संन्यासी, शिक्षण फारसे नसलेला अस्वस्थ होऊन तीन वर्षे भारत उभा – आडवा पिंजून काढणारा हा देश, त्याची अवनती, त्याची कारणे आणि त्यावरचे उपाय अस्वस्थ होऊन शोधत हिंडणारा जगात काय, भारतात काय तो ज्या कलकत्ता शहरात लहानाचा मोठा झाला, त्या शहरातसुद्धा त्याचे नाव फारसे कोणाला माहीत नव्हते आणि एक दिवस अचानक भारतात नव्हे तर जगभर फक्त त्याच्याच नावाचा जयजयकार तुम्हाला माहीत आहे?
सर्वधर्म परिषदेचे आमंत्रण विवेकानंदांना नव्हते!
खिल्ली उडवून त्यांना परत पाठवले होते!
कसे मिळविले त्यांनी आमंत्रण ? कसे मिळविले त्यांनी अद्भुत यश?
Reviews
There are no reviews yet.