मकरंद साठे | Makarand Sathe
मकरंद साठे हे एक मराठी नाटककार, लेखक व नाट्यदिग्दर्शक आहेत. साठे हे व्यवसायाने आर्किटेक्ट आहेत. असे असले तरी ते, साहित्य अकादमीच्या अनुवादित पुस्तकांच्या २०१७ सालच्या पुरस्कारांसाठीच्या निवड समितीचे सदस्य होते.[१][२] [३] भारतीय रंगभूमीवर नावीन्यपूर्ण, प्रयोगशील आणि मराठी नाटक, साहित्याला नवी दिशा, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठराविक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.
प्रयोगशील वृत्ती, मराठी नाटकाला, साहित्याला नवी दिशा देणे, अशा तिन्ही पातळींवर चपखल बसणारे नाटककार, लेखक म्हणून मकरंद साठे सर्वपरिचित आहेत.
गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ रंगभूमीवर सातत्याने नवनिर्मिती करणाऱ्या पडद्यामागच्या रंगकर्मीर्च अनेक पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे. थिएटर ॲकॅडमीने १९९० च्या दशकात आयोजिलेल्या एका कार्यशाळेत, 'चारशे कोटी विसरभोळे' या नाटकामुळे मकरंद साठे या नावाचा परिचय झाला. नाटकाच्या नावापासूनच काहीतरी वेगळा आशय मांडण्याचा प्रयत्न साठे यांनी केला. उमेदीच्या काळात प्रयोगशील निर्मिती करणारे अनेक नाटककार कालांतराने ठरावीक चौकटीबाहेर पडण्यास धजावत नाहीत; पण बंदिस्त चौकटीत न अडकता प्रयोगशील निर्मितीचा ध्यास घेणाऱ्या काही मोजक्या नाटककारांमध्ये साठेंचा समावेश होतो.