नरेंद्र दाभोलकर | Narendra Dabholkar
नरेंद्र दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते.
ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा 'शिवछत्रपती' पुरस्कारही मिळाला.
इ.स. 1970 मध्ये मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर त्यांनी सातारा येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला
बाबा आढाव यांच्या 'एक गाव - एक पाणवठा' या चळवळीत दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या इ.स. 1982 मध्ये स्थापन झालेल्या 'अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती'मध्ये कार्य सुरू केले. पण नंतर इ.स. 1989 मध्ये त्यापासून वेगळे होऊन त्यांनी 'महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती' स्थापन केली.
ते साने गुरुजींनी स्थापन केलेल्या 'साधना' या लोकप्रिय साप्ताहिकाचे डिसेंबर 1998 पासून ते मृत्यूपर्यंत संपादक होते.
Author's books
प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे । Prashna Tumcha Uttar Dabholkaranche
हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची शंभर मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते 25 प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.
लढे अंधश्रद्धेचे | Ladhe Andhashraddheche
लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
विवेकाचा आवाज । Vivekacha Aawaj
‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.