Author

सदानंद मोरे | Sadanand More

सदानंद मोरे (देहूकर) हे मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत.
त्यांनी एकदा तत्त्वज्ञान हा विषय, आणि दुसऱ्यांदा प्राचीन भारतीय संस्कृती आणि इतिहास हा विषय घेऊन, असे दोनदा एम.ए. केले आहे.
‘द गीता – अ थिअरी ऑफ ह्यूमन ॲक्शन ‘ या विषयावर मोरे यांचे पीएच.डी.चे संशोधन होते. त्यासाठी लिहिलेल्या प्रबंधाला सर्वोत्कृष्ट प्रबंधलेखनाचा गुरुदेव दामले पुरस्कार मिळाला.
त्यांनी विद्यापीठीय अनुदान मंडळाकडून मिळालेल्या ‘कारकीर्द ॲवार्ड‘ या योजनेअंतर्गत ‘कृष्ण : द मॅन ॲन्ड हिज मिशन ‘ या विषयावर पोस्ट डॉक्टरल संशोधन केले आहे.
ते पेशाने तत्त्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक आहेत. पुणे विद्यापीठातील तत्त्वज्ञान विभागासहित विविध अन्य अध्यासनांचे ते समन्वयक आहेत.
तुकाराम महाराजांचे वंशज म्हणून मिळालेला सांस्कृतिक वारसा बहुविद्या शाखीय व्यासंगाने अधिक समृद्ध करणारे विचारवंत म्हणून त्यांना लोक मानतात.
त्यांनी अनेक संतसाहित्यविषयक तसेच सामाजिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे.
विविध परिसंवाद आणि कार्यशाळांतून त्यांनी अनेक शोधनिबंधांचे वाचन केले आहे आणि अनेक व्याख्याने दिली आहेत.
त्यांचे साहित्य संस्कृती मंडळापासून ते साहित्य अकादमीपर्यंत अनेक साहित्यिक, सांस्कृतिक संघटनांशी दीर्घकाळचे विविधस्तरीय संबंध आहेत.
ते इ.स. २०१५ साली पंजाबमधील घुमान येथे पार पडलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष होते. जळगाव येथे आयोजित राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.

Author's books

Umbarthyavar | उंबरठ्यावर

140.00

उंबरठ्यावर (लेखसंग्रह) – नव्या- जुन्या, प्राचीन – आधुनिकतेच्या उंबरठ्यावर उभे राहुन दाखवलेले काही कवडसे.