Varasa Premacha | वारसा प्रेमाचा
₹120.00वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
सोनाली नवांगुळ या भारतातल्या 'स्पर्शज्ञान' नावाच्या पहिल्या नोंदणीकृत मराठी ब्रेल पाक्षिकाच्या २००८ पासून उपसंपादक असून 'रिलायन्स दृष्टी' या ब्रेल पाक्षिकासाठी सातत्याने लेखन करतात; मुक्त पत्रकार म्हणून विविध नियतकालिकांमध्ये विविध विषयांवर लिहितात. अनुवादक व निवेदिका म्हणूनही त्या काम करतात. त्यांनी लिहिलेल्या वृत्तपत्रीय सदरांचे संकलन असलेले ‘स्वच्छंद' हे पुस्तक 'मेनका प्रकाशना'ने प्रकाशित केले आहे. दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणाऱ्या ऑस्कर पिस्टोरिअस या धावपटूच्या आत्मकथनाचा त्यांनी केलेला अनुवाद ‘ड्रीमरनर' या नावाने ‘मनोविकास'ने प्रकाशित केला आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमधील स्त्रियांचे लेखन मराठीत यावे याकरता 'मनोविकास' प्रकाशनाची कविता महाजन यांनी संपादित केलेली जी पुस्तक मालिका आली त्यातील सलमा या तमिळ बंडखोर लेखिकेची कादंबरी सोनाली यांनी ‘मध्यरात्रीनंतरचे तास' या नावाने मराठीत आणली आहे. त्यांची आणखी दोन पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. सोनाली यांनी २०१४ मध्ये पुणे येथे झालेल्या 'अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलना'चे अध्यक्षपद भूषविले आहे.
वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
‘Legacy of Love’ हे पुस्तक मराठीत ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने गेल्या वर्षी साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्याचाच उत्तरार्ध म्हणावे असे छोटे पुस्तक म्हणजे ‘Gift of Anger’, त्याचा हा मराठी अनुवाद.