Author

यशवंत सुमंत | Yashwant Sumant

राज्यशास्त्राचे अध्यापक-अभ्यासक. तत्त्वज्ञान, इतिहास, धर्म, साहित्य, संगीत अशा विविध क्षेत्रात व्यासंग. सम्यक साक्षेपी विचारवंत. विद्यार्थीप्रिय शिक्षक.

समता आणि सामाजिक न्यायाचे लढे अधिक व्यापक व परिणामकारक व्हावेत, भारतीय समाजातील विविधता टिकून राहावी, सहिष्णुता वृद्धिंगत व्हावी, नागरी समाजाच्या लोकशाहीकरणाला चालना मिळावी यासाठी महाराष्ट्रात सर्वदूर आणि सातत्याने प्रबोधनाचे कार्य. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी संघटनांसाठी अभ्यास- शिबिरे घेणे, त्यांना वैचारिक मार्गदर्शन करणे व वैचारिक नेतृत्व देणे, विविध पुरोगामी चळवळी आणि कार्यकर्ते यांच्यात हार्दिक संवाद प्रस्थापित करणे यांसारखी कार्ये शेवटपर्यंत अत्यंत निष्ठेने केली. 'महात्मा ते महात्मा समता अभियाना'चे प्रणेते.

Author's books

महात्मा गांधींची विचारसृष्टी | Mahatma Gandhinchi Vicharsrushti

140.00
महात्मा गांधींची विचारसृष्टी – काही अलक्षित पैलू (लेखसंग्रह) – गांधींविषयी खूप काही लिहिले गेले आहे, पण त्यातूनही फार लक्ष गेले नाही असे काही पैलू दाखवणारे पुस्तक.