Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद
₹240.00२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.
१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.
Bakhar: Bharatiy Prashasanachi | बखर: भारतीय प्रशासनाची
₹280.00भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख
Yugantar | युगांतर
₹140.00युगांतर (लेखसंग्रह) – व्यक्ती, समष्टी, स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, लोकशाही, राजकारण, सेक्युलॅरिझम इत्यादी संकल्पनांवर विचारप्रवर्तक लेख.