Charvak। चार्वाक
₹140.00आज एकविसाव्या शतकात एवढे संशोधन होऊनही चार्वाकांचा एकही ग्रंथ संशोधकांना सापडला नाही, त्यांची परंपरा समजली नाही की तिचे अवशेष हाती लागले नाहीत. धर्म व सत्ता यांना केलेला विरोध चार्वाकांना सारे काही गमावण्यापर्यंत घेऊन गेला. हिंदू धर्म त्याच्या सहिष्णुतेसाठी प्रसिद्ध आहे. त्याने इतर धर्मांचे ग्रंथ जपले… पण चार्वाकांचा एकही ग्रंथ ठेवला नाही… कारण इतर धर्म कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ईश्वर, मंदिर व भक्ती मानत होते. चार्वाकांचा लढाच त्याविरुद्ध होता.
Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण
₹40.00अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी १९५६ मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.
Asehi Vidwan | असेही विद्वान
₹120.00असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.