Poshindyache Aakhyan | पोशिंद्याचे आख्यान
₹280.00शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
Gopal Rathi –
खूपच सुंदर लिखाण आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे लिखाण इमॅजिनेशन नसुन प्रत्यक्ष व्यक्तीच्या अनुभवातून लिहिल्या गेलेले आहेत. त्यामुळे त्यातली खोली व भाव मनाला खूप स्पर्श करून जातात.
वाचनीय पुस्तक.
सगळ्यांनी एक एक प्रत तरी घ्यावी
Ameya Ladda (verified owner) –
डॉक्टर आणि हॉस्पिटल हे स्वतःतच एक वेगळं विश्व असतं. आणि नाही म्हटलं तरी प्रत्येकाचा याच्याशी आयुष्यात संबंध येतोच.
डॉक्टर, पेशंट व त्यांचे नातेवाईक या सगळ्यांची त्या वेळेची मानसिकता व त्यातून आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांची शिदोरी असलेले हे पुस्तक वाचकाला समृद्ध करते आणि नवा दृष्टिकोन सुद्धा देते.
Worth Reading! 👍🏻
Naresh Ubale. –
डॉक्टर जेव्हा त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरु करतात व जसजसे ते त्यात रमतात.या काळात रुग्णांकडून ते कसे शिकत जातात व हळूहळु चांगले डॉक्टर म्हणून कसे तयार होतात याचा लेखाजोखा या पुस्तकात वाचायला मिळतो.हा एक खूप वेगळा दृष्टिकोन या पुस्तकात वाचायला मिळतो.थोडक्यात रुग्णही डॉक्टरला कसे घडवत असतात हा नवीन दृष्टिकोन या पुस्तकाच्या रूपाने डॉक्टर असलेल्या लेखिकेने मांडला आहे.
सुंदर पुस्तक आहे.
Naresh Ubale. –
छान पुस्तक आहे