संकीर्ण

Lal Shyam Shah | लाल श्याम शाह

160.00

सुदीप ठाकूर यांचे हे पुस्तक विविध व्यक्तींच्या मुलाखती, सरकारी कागदपत्रे, पुस्तके, आणि अहवाल यावर आधारित आहे. खूप सावधपणे केलेल्या संशोधनाबरोबरच खूप प्रेमाने लिहिलेले हे पुस्तक म्हणजे एका असाधारण भारतीयाला वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली आहे.

लाल श्याम शाह हे मध्य भारतातील आदिवासींचा आवाज होते, त्यांचा अंतरात्मा होते. ते सही करताना त्यांच्या नावाच्या बरोबर ‘आदिवासी’ हा शब्दही लिहीत असत. ‘लाल श्याम शाह, आदिवासी’ असे ते गर्वाने आणि निर्भयतापूर्वक लिहीत असत. आपल्या लोकांविषयी, समाजाविषयी पूर्ण एकरूपता आणि बांधिलकी दाखवण्याचा तो एक मार्ग होता. आजच्या राजकीय नेत्यांच्या विपरीत त्यांचे वर्तन म्हणावे लागेल. कारण त्यांनी स्वतःच्या राजकीय आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नाही, तर आपल्या समाजाच्या स्वाभिमानासाठी संघर्ष केला. त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी, त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण व्हावा यासाठी, तसेच त्यांचे ऐतिहासिक महत्त्व पटावे व तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात वाचले जायला हवे.

– रामचंद्र गुहा (प्रस्तावनेतून)

     

 

Lata Lahari | लाटा लहरी

80.00
लाटा लहरी (संवादचित्रे) – २५ वर्षांच्या आतबाहेरचे वय असलेल्या सहा तरुण मित्रांचे विविध विषयांच्या निमित्ताने झडलेले मार्मिक वादसंवाद.

     

Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला

280.00

हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यात अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.

     

MI BHARUN PAVALE AHE। मी भरून पावले आहे

200.00

मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.

     

Muka Mhane… | मुका म्हणे…

160.00

मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.

     

Saleनवी पुस्तके

Out Of The Box | आऊट ऑफ द बॉक्स

100.00
कार्यक्षम प्रशासक आणि सर्जनशील लेखक अशी दुहेरी ओळख असणारे लक्ष्मीकांत देशमुख 2014 मध्ये आय.ए.एस. सेवेतून निवृत्त झाले आणि 2018 मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा बहुमानही त्यांना मिळाला. त्या पार्श्वभूमीवर त्यांची एक दीर्घ मुलाखत साधना साप्ताहिकातून क्रमश: आठ भागांत प्रकाशित केली होती. ती संपूर्ण मुलाखत आता एकत्रित स्वरूपात पुस्तकरूपाने आणली आहे.

     

Poshindyache Aakhyan | पोशिंद्याचे आख्यान

280.00

शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!

अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.

गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.

– विनय हर्डीकर

     

 

Pudhe Janyashathi mage valun pahtana | पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना

70.00

२०१७ च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत.

     

1 2 3 4 6