Rugnanchya Chashmyatun | रुग्णांच्या चष्म्यातून
₹100.00एकनाथांनी सांगितलं होतं, “रोग गेलियाचे लक्षणे, रोगी नेणे, वैद्य जाणे” त्याप्रमाणे लोहिया यांनी ‘रुग्णांच्या चष्म्यातून’ सध्याची वैयक्तिक व सामाजिक आरोग्यावस्था दाखवत त्यातून सुव्यवस्थेकडे जाण्याचे सूचनही केलं आहे. हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे. डॉ. लोहिया यांचे वाचन अद्ययावत असल्यामुळे त्यांनी प्रत्येक प्रकरणाचा आरंभ हा नेमक्या व चपखल अवतरणाने केला आहे. त्यातून विशाल विचारपटाची पार्श्वभूमी तयार होते. हे पुस्तक, वाचकाला एकाच वेळी डॉक्टर व रुग्ण ह्या दोघांच्या चष्म्यातून पाहण्याची काळानुरूप दृष्टी देण्याचं कार्य करणार आहे.
– अतुल देऊळगावकर (प्रस्तावनेतून)
Rugnanubandha | रुग्णानुबंध
₹160.00रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.
SAARC Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस
₹80.00सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणसाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुलामुलींचे लेख.
Shyamchi Aai Watchal eka Sahityakrutichi | श्यामची आई वाटचाल एका साहित्यकृतीची
₹100.00‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहून झाल्यापासून आतापर्यंत म्हणजे तब्बल ८८ वर्षांत त्याबाबत खूप काही घडले आहे. त्या सर्वांची एकत्रित माहिती कुठेही उपलब्ध नाही, पण ती असायला हवी. त्या दृष्टीने केलेला हा एक प्रयत्न आहे.