या पुस्तकातील भाषणे राजकारण, समाजकारण, साहित्य, प्रशासन, पत्रकारिता, क्रीडा, अर्थकारण इत्यादी क्षेत्रांतील मान्यवरांची आहेत… ही भाषणे वाचकांशी संवाद साधताहेत अशा पद्धतीने लिहिली/शब्दांकन केलेली आहेत. यातील काही भाषणे विषय मुळापासून समजावून देणारी आहेत, तर काही भाषणे विषयाचा गाभा व आवाका सांगणारी आहेत. त्यामुळे ही भाषणे अनेक छोटी-मोठी दालने खुली झाल्याचा आनंद देणारी किंवा आपला दृष्टीकोन सुधारून घ्यावा अशी जाणीव उत्पन्न करणारी आहेत. वक्त्यांची व विषयांची इतकी विविधता व इतकी खोली असलेला भाषणसंग्रह आजच्या मराठीत तरी दुसरा नाही.
भूमिका विशेषांक | Bhumika Visheshank
₹50.00क्षितिज पटवर्धन लिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ या नाटकाचा 50 वा प्रयोग पुण्यात होत आहे. त्या निमित्ताने साधना साप्ताहिकाने विशेषांक तयार केला आहे. त्याचे प्रकाशन 15 ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाआधी झाले आहे. लेखक आणि दिग्दर्शक या दोघांनी या नाटकाच्या लेखनामागील व दिग्दर्शनाची प्रक्रिया उलगडून सांगणारे दीर्घ लेख या अंकासाठी लिहिले आहेत. आणि तीन दशकांनंतर मराठी रंगभूमीवर या नाटकाद्वारे दमदार पुनरागमन करणारे अभिनेते सचिन खेडेकर यांची विनायक पाचलग यांनी घेतलेली दीर्घ मुलाखतही या अंकाचे मोठे आकर्षण आहे. शिवाय, या नाटकात विविध पात्र रंगवणाऱ्या समिधा गुरु, सुयश झुंजुरके, जाई खांडेकर, जयश्री जगताप व अतुल महाजन या पाच कलाकारांचे लेखही आहेत. नाटकातील विविध प्रसंगांच्या छायाचित्रांसह तयार केलेला हा बावन्न पानांचा अंक पूर्णतः बहुरंगी आहे.







Reviews
There are no reviews yet.