पोशिंद्याचे आख्यान | Poshindyache Aakhyan
₹280.00शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
भारतीय अर्थकारणावरील निबंध | Bhartiya Arthkarnavaril Nibandh
₹360.00“स्थानिक सत्तेचे सर्वांत कनिष्ठ एकक विचारात घ्यायचे झाले तर भारतातील ग्रामसमुदायाइतक्या स्वयंपूर्ण व स्वावलंबी एककासारखा कोणताच दाखला युरोपातील कोणत्याही देशात सापडत नाही. रशियातील ‘मीअ’ (Mere), जर्मनीमधील ‘गाउ’ (Gau), फ्रान्समधील ‘कमिन’ (Commune), इंग्लंडमधील ‘पॅरिश’ (Parish) यांचा उगम भारतीय गावाशी मिळताजुळता असला तरी, जुन्या काळी भारतीय ग्रामसमुदाय पूर्ण स्वातंत्र्य बाळगून होता, तसे मात्र या इतर देशांमधील रचनांबाबत म्हणता येत नाही. पण, भारतातील लोकांनी सभ्य व सामुदायिक जीवनाचा पुढील विकास मात्र साधला नाही.
जुन्या ग्रीक व रोमन समुदायांनी अनुक्रमे ‘सिव्हिटास’ व ‘डेमॉस’ या रचना परिपूर्णरीत्या विकसित केल्या. इटलीतील काही शहरे, जर्मनीतील काही स्वतंत्र शहरे, नेदरलँड्स व स्वित्झर्लंड आणि युरोपीय इतिहासातील सर्वोत्तम काळाचा अपवाद वगळता ग्रीक व रोमन समुदायांच्या रचनांच्या तोडीची कामगिरी इतरांना फारशी करता आली नाही.”
– न्या. महादेव गोविंद रानडे (इंग्लंड व भारत येथील स्थानिक शासन)
मी भरून पावले आहे । Mi Bharun Pavale Aahe
₹200.00मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.
मुका म्हणे… | Muka Mhane…
₹160.00मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे.