वाचता वाचता । Vachata Vachata
₹280.00गोविंदराव तळवळकर यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये ‘वाचता वाचता’ हा स्तंभ ‘वाचस्पती’ या टोपणनावाने लिहिला, तो नंतर प्रेस्टीज प्रकाशनाकडून पुस्तकरूपाने 1979 मध्ये आला होता. त्या पुस्तकाची नवी आवृत्ती साधनाकडून हार्डबाऊंडमध्ये.
शब्दांचीच शस्त्रे | Shabdanchich Shastre
₹400.00संपादकाच्या नावे व संपादकीय लेखनासाठी ओळखले जाणारे आजच्या काळातले एक मासिक आहे ‘पुरोगामी जनगर्जना’ आणि त्याचे संपादक आहेत डॉ.अभिजित वैद्य. स्वतःची अभ्यासांती बनलेली सुस्पष्ट व ठाम वैचारिक भूमिका आणि वृत्तपत्राच्या तुलनेत मासिक असल्यामुळे दीर्घ निर्बंधवजा विषयाचा सर्वांगीण वेध घेणाऱ्या अभ्यासू संपादकीय लेखनामुळे ‘पुरोगामी जनगर्जने’ला वैचारिक स्वरूप आणि स्वतःची वेगळी ओळख डॉ. अभिजित वैद्य यांच्यामुळे लाभली आहे. डॉ. वैद्य यांच्या पुरोगामी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेचा प्रत्यय त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेखात येतो. त्यामुळेच वाचकांना वर्ण्य विषयाच्या सर्व बाजूचे ज्ञान होते, तसेच त्यांची वैचारिक जनहिताची ठाम भूमिकाही समजून येते. डॉ. अभिजित वैद्यांचे सर्व लेख शैलीदार व वाचनीय आहेत. त्यांची मराठी भाषा व्यंग, उपहास, अतिशयोक्ती अशा विविध भाषिक आयुधांनी संपन्न आहे. अनेक लेख त्यामुळे साहित्यगुणांनी संपन्न होत अभिजाततेकडे झुकतात. या पुस्तकातील बहुसंख्य लेखांना ‘लॉंग शेल्फ लाईफ’ प्राप्त झाले आहे.
संकीर्ण निबंध | Sankirna Nibandha
₹480.00“सर्वंकष दृष्टीने पाहिले तर इथे मांडलेले चित्र अजिबात समाधानकारक नाही, हे खरे आहे. मराठी भाषेने प्रगतीचा जो टप्पा सध्या गाठला आहे, त्यात पूर्णत्वास गेलेले गतकालीन यश नसून भविष्यासाठीची आश्वासकता दिसते आहे, या दृष्टीने त्याचे कौतुक व्हायला हवे. चाळीस वर्षांच्या तुटपुंज्या कालावधीचा विचार केल्यावर मात्र आपल्याला एवढ्याशा काळात झालेल्या कामाचे प्रमाण पाहून आश्चर्य वाटते. विशेषतः या इलाक्यातील भगिनी भाषांचे तुलनात्मक दारिद्र्य लक्षात घेता मराठीतील काम लक्षणीय ठरते.
मराठीने आत्तापर्यंत साधलेल्या प्रगतीचे अवाजवी अवमूल्यन केल्याचा आरोप माझ्यावर लावला जाणार नाही, अशी मला आशा आहे. परंतु, परक्याच्या दृष्टीकोनातून आपल्या सध्याच्या साहित्याकडे पाहणाऱ्या कोणालाही हे साहित्य बहुतांशाने अंधश्रद्धाळू वा बालिश वाटेल, यात काही शंका नाही. ही निंदा पुसून काढण्यासाठी अनेक शतके कळकळीचे प्रयत्न करावे लागतील. परंतु, वर्तमानकाळ अनेक अर्थानी आश्वासक आहे, आणि लवकरच मराठी आधुनिक भारतातील प्रगत भाषांमध्ये पहिल्या क्रमांकाचे स्थान पटकावेल, अशी स्पष्ट शक्यताही दिसते आहे.”
न्या. महादेव गोविंद रानडे (देशी प्रकाशनसूचीमधील मराठी भागाबद्दल टिप्पणी)
सार्क विद्यापीठातील दिवस | SAARC Vidyapithatil Divas
₹70.00सार्क विद्यापीठातील दिवस (लेखसंग्रह) – दिल्ली येथी सार्क विद्यापीठातील उच्च शिक्षणासाठी आलेल्या आठ देशांतील – अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका मालदीव व भारत – आठ मुला-मुलींचे लेख.