सामाजिक

Saleनवी पुस्तके

Dr. Babasaheb Ambedkar tyanchyach shabdat | डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याच शब्दांत

70.00

हे पुस्तक लिहिण्याची पद्धत मोठी अफलातून आहे. प्रत्यक्ष न घेतलेल्या (काल्पनिक) मुलाखतींवर हे पुस्तक आधारलेले आहे. तरीही मुलाखती वास्तवच वाटतात. पुस्तकाची अशी रचना केली आहे की, एकदा वाचायला सुरुवात केल्यावर पुढे वाचतच राहावेसे वाटते.

मुलाखती काल्पनिक तरीही वास्तवावर आधारलेल्या असल्याने, बाबासाहेबांच्या हयातीनंतरच्याही काही घटना या पुस्तकात आल्या आहेत. त्याबाबतही बाबासाहेबांना प्रश्न विचारण्यात आले आहेत, ते बाबासाहेबांच्या जास्तीत जास्त विचारांचा समावेश करता यावा म्हणून. त्यात खटकण्यासारखे काही नाही.

बाबासाहेबांचे म्हणणे बाबासाहेबांच्या तोंडून इतक्या सोप्या भाषेत सांगणे हे अवघड काम आहे. प्रधानसरांनी ते यशस्वीपणे करून दाखविले आहे.

 

     

Saleनवी पुस्तके

Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

Saleनवी पुस्तके

Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका

60.00

१४ डिसेंबर १९४७ ते ४ जानेवारी २०२३ असे ७५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म  महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. १९९४ नंतरच्या २८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.

 

     

Thaiman Changalvadache| थैमान चंगळवादाचे

60.00

आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

     

Saleनवी पुस्तके

Tin Sampadakanchya Mulakhati | तीन संपादकांच्या मुलाखती

70.00

एन. राम सांगत आहेत १४५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाच्या वाटचालीबद्दल.

शेखर गुप्ता सांगत आहेत ‘द इंडियन एक्सप्रेस’, ‘इंडिया टुडे’ आणि ‘द प्रिंट’ येथील स्वतःच्या कारकिर्दीबद्दल.

नरेश फर्नांडिस सांगत आहेत ‘स्क्रोल’ या डिजिटल पोर्टलवरील संपादनाबाबत….

हे तिन्ही संपादक इंग्रजी पत्रकारितेत आहेत, देशाच्या तीन टोकांवरील तीन महानगरांत (चेन्नई, दिल्ली, मुंबई) राहून तिघांनी पत्रकारिता केली आहे. तिघे तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील आहेत, तिघांनीही पूर्णतः वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे, तिघांच्याही दृष्टिकोनांत फरक आहे, तिघांनीही पत्रकारिता गांभीर्याने केलेली आहे आणि तिघांचीही पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी पक्की आहे.