साहित्य

Saleनवी पुस्तके

Amha Ghari Dhan | आम्हा घरी धन

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने 1994 पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर 1996 पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र 2015 ते 2019 या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

त्या पाच वर्षात साहित्य विभागात दर वर्षी चार किंवा पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये साहित्य जीवनगौरव, ललित ग्रंथ पुरस्कार, वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, नाट्यलेखन पुरस्कार आणि विशेष ग्रंथ पुरस्कार किंवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील साहित्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण 22 व्यक्तींच्या मुलाखतींचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

       

Saleनवी पुस्तके

Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत

70.00

कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.

 

Laurie Baker – Nisargasanvadi Abhijat Vastukala । लॉरी बेकर – निसर्गसंवादी अभिजात वास्तुकला

280.00

हरित इमारत, पर्यावरणपूरक वास्तू, भूकंपरोधक घरे, सर्जनशील निवास, नगररचना वास्तुकलेतील कोणत्याही प्रांतात नव्याने काही घडत असेल तर त्यावर बेकर यांचा प्रभाव अटळ आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, बुद्धी व भावना, निसर्ग व माणूस, आशय व घाट यांत अद्वैत साधून आधुनिकता व सुसंस्कृतता रुजवणारी बेकर यांची ही सर्जनशील यात्रा 59 वर्षे अथक होती.

     

Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना

280.00

साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.

     

Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार

160.00

साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.

     

Saleनवी पुस्तके

Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका

60.00

14 डिसेंबर 1947 ते 4 जानेवारी 2023 असे 75 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. 1994 नंतरच्या 28 वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.

 

     

Saleनवी पुस्तके

Shastriji | शास्त्रीजी

160.00

‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! 27 जानेवारी 1901 ते 27 मे 1994 असे 93 वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.

अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे, त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

   

Shyamchi Aai | श्यामची आई

160.00

अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.

-आचार्य अत्रे

     

1 2 9