Sale

100.00

दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे.

     

Share

Meet The Author

या पुस्तकात ‘दलपतसिंग येती गावा’ या नाटकाविषयी फार थोडे बोलले गेले आहे, बहुतेक सर्व जण सांगत आहेत ते या नाटकाच्या निर्मितिप्रक्रियेविषयी. अरुणा रॉय यांनी राजस्थानातील देवडुंगरी या खेड्यातील मजूर-शेतकऱ्यांना घेऊन तिथल्या स्थानिक प्रस्थापितांच्या (राजकारणी, जमीनदार, प्रशासकीय अधिकारी) विरोधात दिलेला लढा आणि त्यातून उगम पावलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा याची गोष्ट म्हणजे हे नाटक आहे. आणि अतुल पेठे यांनी जांबसमर्थ या गावात सात-आठ महिने तंबू ठोकून, तिथल्या लोकांना हाताशी धरून माहितीच्या अधिकारावरील जे नाटक उभे केले, त्याची हकिगत म्हणजे हे पुस्तक आहे. अरुणा रॉय यांना शंकरसिंग आणि निखिल हे या दोन सहकाऱ्यांची ज्या पद्धतीची खंबीर साथ मिळाली, तशीच साथ अतुल पेठे यांना राजकुमार तांगडे (दलपतसिंग) आणि संभाजी तांगडे (शाहीर) यांची मिळाली आहे. अरुणा रॉय आणि अतुल पेठे यांच्यातील या खूपच मर्यादित अर्थाने पण महत्त्वाच्या अशा साम्यस्थळाबरोबरच इतरही काही साम्यस्थळे अरुणा रॉयचा लढा आणि अतुल पेठेंचा प्रकल्प यांत पाहायला मिळतील. त्यामुळे हे पुस्तक कोणालाही ‘दलपतसिंग येती गावा’ हे नाटक पाहण्याची आणि अरुणा रॉय यांच्या कार्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा होईल; किंबहुना तसे केल्याशिवाय या पुस्तकाची खुमारी आणि मोल नीट कळणार नाही.

– संपादकीयातून

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1 × 21.5 cm
Size

M, S

Pages

122

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “दलपतसिंग येती गावा (नाट्यनिर्मिती प्रक्रिया) | Dalpatsingh Yeti Gava (Natyanirmiti Prakriya)”

Your email address will not be published.