Trikoni Sahas | त्रिकोणी साहस
₹480.00या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल…
Vadalache Kinare | वादळाचे किनारे
₹80.00नेहमीचा पाऊस तयार होतो त्याची एक टप्प्याटप्प्याची कृती असते. समुद्राचे पाणी, हवेचे प्रवाह आणि उष्णता ह्यांच्या प्रक्रियेमध्ये काही बदल घडले तर त्याच घटकांमधून चक्रीवादळ तयार होते असं शास्त्रज्ञ सांगतात. जगण्याच्या लयीमध्ये असे विलक्षण बदल झाले की नेहमीच्या सवयी विस्कटतात आणि आरोग्याला त्रास देणाऱ्या सवयी तयार होतात. वेगवेगळ्या व्यसनांची वादळे, कुटुंबांच्या आकाशामध्ये अशीच तयार होतात. वादळ तयार झाले की त्याचा भरकटलेला प्रवास सुरू होतो. शेवटी ते कोणत्यातरी किनाऱ्यावर धडकते. तिथे खूपच नुकसान करून जाते. त्या किनाऱ्याचा काही दोष असतो का त्यात ?… पण किनारासुद्धा निसर्गाचाच भाग नाही का. प्रत्येकवेळी शिस्तशीर पावसाने यावे आणि सुखसमृद्धी आणावी असे होत नाही. व्यसनांच्या वादळाच्या किनाऱ्यावर असतात व्यसनात अडकलेल्या माणसाचे कुटुंबीय. कुणाची पत्नी, कुणाचे आई-वडील, भाऊ-बहिणी आणि हो, अनेकांची मुले. वेगवेगळ्या वयांची बुद्धीची, क्षमतांची.
Vikas Geete | विकास गीते
₹80.00आज मराठीमध्ये हेतुपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्रमैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.
अहा, देश कसा छान! | Aha, Desh Kasa Chhan
₹100.001990 दरम्यान त्यांनी कोकण, राजस्थान, हिमालय, नेपाळ या प्रदेशांत भ्रमंती केली, त्यावर आधारित लेख साधना साप्ताहिकात प्रसिद्ध झाले आणि नंतर त्यांचेच ‘अहा, देश कसा छान!’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
आठवणी जुन्या शब्द नवे | Athvani Junya Shabda Nave
₹100.00आठवणी जुन्या आणि शब्द नवे. वर्षानुवर्षे कुठेतरी साठवून ठेवलेले आणि साठून राहिलेले हळूहळू बाहेर यायला सुरुवात झाली. भूतकाळात डोकावून पाहताना प्रसंग, चित्रे जशीच्या तशी उभी राहात गेली. आणि नकळत कागदावर उतरत गेली. हे चित्रण म्हणजे केवळ घटनांचे किंवा व्यक्तिरेखांचे वर्णन नसून, त्याच्यामागे असलेल्या मनातील भावनांचा प्रवाह आहे.
उघडा, दरवाजे उघडा…!। Ughada, Darwaje ughada…!
₹60.00हिंदीतील प्रसिद्ध लेखक कृष्ण चंदर यांच्या ‘दरवाज़े खोल दो’ या मूळ उर्दू नाटकाचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे.