Ladhe Andhashraddheche | लढे अंधश्रद्धेचे
₹280.00लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – १९८९ ते १९९९ या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णीत होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
कोंडून पडलेली भयग्रस्त राज्यव्यवस्था, गुदमरलेलं प्रजासत्ताक आणि कुपोषित लोकशाही या सगळ्याला मदतीचा हात कसा मिळाला, याची कहाणी या पुस्तकातून आपल्यासमोर उलगडत जाते. निराळ्या शब्दांत सांगायचं तर, ‘घटनात्मक नैतिकता’ वाचवण्यासाठी सरसावलेला हा मदतीचा हात आहे. अनन्यसाधारण प्रेरणादायक व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुणा रॉय आणि त्यांचे सहकारी निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व त्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या इतर मंडळींनी मिळून १९९० मध्ये राजस्थानातील दुर्गम खडकाळ भागात ‘मजदूर किसान शक्ती संघटन’ या संस्थेची स्थापना कशी व का केली इथपासून प्रस्तुत पुस्तकाचं ‘कथानक’ सुरू होतं.
अनेक बेधडक अभियानं चालवून, निग्रहाने प्रतिकार करून, अटीतटीच्या वाटाघाटींना तोंड देऊन, कठोर निर्णय घेऊन, प्रसंगी हलाखी व छळ सहन करून या संघटनेने असाधारण धोक्यांचा सामना केला. अजाणपणाचा अंधार दूर करणं, कायदे व हक्क यांच्याविषयीची समजूत वाढवणं, दिवसाढवळ्या झोपा काढणाऱ्या प्रशासकांना जागं करण्यासाठी आवश्यक असलेला निर्धार व निधडेपणा दृढ करणं, या उद्देशाने हे प्रयत्न करण्यात आले. ही कहाणी अनपेक्षितरीत्या मिळालेल्या समर्थनाचीसुद्धा आहे. ‘हल्ल्याचं लक्ष्य’ असलेल्या नोकरशाहीमधल्याच काही जागरूक घटकांकडून या चळवळीला अनेकदा समर्थन मिळालं; शिवाय बुद्धिजीवी, लेखक, इतर बिगरसरकारी संस्था आणि दुर्गम ठिकाणच्या प्रबुद्ध भारतीय लोकमताकडूनही समर्थन मिळालं.
– गोपाळकृष्ण गांधी (प्रस्तावनेतून)
2005 मध्ये माहिती अधिकार कायदा अस्तित्त्वात आला, त्याला प्रामुख्याने कारणीभूत ठरला, 1990 नंतर अरुण रॉय व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेला लढा. या लढ्याची कहाणी सांगणारे पुस्तक द आरटीआय स्टोरी या नावाने आले. त्या पुस्तकाचा अवधूत डोंगरे यांनी केलेला हा अनुवाद.
संपादकाच्या नावे व संपादकीय लेखनासाठी ओळखले जाणारे आजच्या काळातले एक मासिक आहे ‘पुरोगामी जनगर्जना’ आणि तिचे संपादक आहेत डॉ. अभिजित वैद्य. स्वतःची अभ्यासांती बनलेली सुस्पष्ट व ठाम वैचारिक भूमिका आणि वृत्तपत्राच्या तुलनेत मासिक असल्यामुळे दीर्घ निर्बंधवजा विषयाचा सर्वांगिण वेध घेणाऱ्या अभ्यासू संपादकीय लेखनामुळे ‘पुरोगामी जनगर्जने’ला वैचारिक स्वरूप आणि स्वतःची वेगळी ओळख डॉ. अभिजित वैद्य यांच्यामुळे लाभली आहे. डॉ. वैद्य यांच्या पुरोगामी आणि मूल्याधिष्ठित भूमिकेचा प्रत्यय त्यांच्या प्रस्तुत पुस्तकातील प्रत्येक लेखात येतो. त्यामुळेच वाचकांना वर्ण्य विषयाच्या सर्व बाजूचे ज्ञान होते, तसेच त्यांची वैचारिक जनहिताची ठाम भूमिकाही समजून येते. डॉ. अभिजित वैद्यांचे सर्व लेख शैलीदार व वाचनीय आहेत. त्यांची मराठी भाषा व्यंग, उपहास, अतिशयोक्ती अशा विविध भाषिक आयुधांनी संपन्न आहे. अनेक लेख त्यामुळे साहित्यगुणांनी संपन्न होत अभिजाततेकडे झुकतात. या पुस्तकातील बहुसंख्य लेखांना ‘लॉग शेल्फ लाईफ’ प्राप्त झाले आहे.
विनोबा महाराष्ट्रात आले तोपर्यंत लाखो एकर जमीन दानात मिळाली होती. हजारो गावे ग्रामदान झाली होती.
भूदान-यज्ञादरम्यान अनेक विचार प्रकट झाले होते, अनेक कार्यक्रम पुढे आले होते. ही सगळी शिदोरी घेऊन विनोबा त्यांच्या प्रिय महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रापुढे त्यांनी हृदय मोकळे केले. यामुळेच त्यांच्या येथील अनेक भाषणांना वेगळ्याच जिव्हाळ्याचा स्पर्श आहे. या पदयात्रेतील त्यांच्या भाषणांच्या संपादनातून ‘महाराष्ट्रात विनोबा’ पुस्तकाचे चार भाग प्रकाशित झाले (1958-59).
या भाषणांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ती मराठीत आहेत. भारतभरच्या पदयात्रेत महाराष्ट्र आणि गुजरातचा अपवाद वगळता विनोबा हिंदीत बोलले. फक्त महाराष्ट्रात मराठीत. त्यांची मराठी वक्तृत्वशैली या पुस्तकामध्ये दिसते तशी साहजिकच अन्यत्र दिसत नाही. विनोबांच्या विविध विषयांवरील विचारांना संकलित-संपादित करून अनेक पुस्तके विभिन्न भाषांमध्ये तयार झाली आहेत. ती उपयोगी आहेतच. मात्र मूळ भाषणांमधील खुमारी त्यांच्यात असू शकत नाही.