रुग्णानुबंध | Rugnanubandha
₹160.00रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.
रुग्णानुबंध (व्यक्तिचित्रे) – एका संवेदनशील फॅमिली डॉक्टरला प्रॅक्टिस करताना दिसलेले अस्वस्थ समाजचित्र.
लढे अंधश्रद्धेचे (कार्यकथन) – 1989 ते 1999 या दहा वर्षांच्या काळात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दिलेल्या अनेक लढ्यांच्या, प्रबोधन मोहिमांच्या संघर्षाची कहाणी.
लोकशाहीची आराधना (भाषणसंग्रह) – बॅरिस्टर नाथ पै यांनी संसदेबाहेर केलेल्या 15 भाषणांचा संग्रह. राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील विचारप्रवण करणारी ही शैलीदार भाषणे आहेत.
वारसा प्रेमाचा (आत्मकथनात्मक) – मणिलाल गांधी यांचे चिरंजीव आणि महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांना वयाच्या बाराव्या वर्षी आजोबांच्या सहवासात दीड वर्ष राहता आले, त्यावर आधारित लेखन.
‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे. मात्र एकाच वेळेला हे सुख भौतिक आहे, बौद्धिक आहे, भावनिक आहे, नैतिक आहे आणि सर्जनशील आहे. दुसऱ्या बाजूला, हे सुख अखिल मानव जात, अखिल प्राणीमात्र आणि निसर्ग यांच्याशी सुसंगत आहे. तिसऱ्या बाजूला, हे सुख ज्या वेळी अस्तित्वात येतं, त्या वेळी साध्य-साधन शुचिता पाळली जाते. त्यामुळे अशा सम्यक आणि व्यापक अर्थाने ‘विवेकवाद’ हे सुखी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे.
जो वाचक आनंद करंदीकर यांना प्रत्यक्ष ओळखत नाही किंवा ज्या वाचकांना त्यांचे लिखाण सोडून त्यांच्याविषयी अन्य माहिती नाही, अशा वाचकाने हे पुस्तक वाचून त्यांच्या वयाचा अंदाज करावा. लेखक तरुण आहे म्हणावं तर एवढा अनुभव, अभ्यास, प्रगल्भता आणि शहाणपण लहान वयात कसं येईल असं वाटेल, लेखक वृद्ध आहे असं म्हणावं तर लेखनातील दृष्टीकोन, भाषाशैली, विचार अगदी तरुण आहेत. शिवाय, अनुभवाच्या व अभ्यासाच्या आणि त्यातून आलेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर लेखक ‘कन्क्लुजन’ काढून रिकामा झालेला नाही. त्याने आणखी अभ्यासाचा व नवीन शिकण्याचा प्रवास थांबवलाय असं वाटत नाही.
शिक्षक, प्राध्यापक, कार्यकर्ता, पत्रकार, लेखक, संपादक आणि समीक्षक असे प्रमुख आयाम असलेल्या विनय हर्डीकर यांच्या लेखनकार्याचे विशेष महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे. मात्र रूढार्थाने लिहिली जातात तशी ही व्यक्तिचित्रे नसतात, त्यांना व्यक्तिविमर्श म्हणणेच योग्य ठरेल. कारण त्या-त्या व्यक्तीच्या विचारांचा वा कार्याचा गाभा व आवाका या लेखनाच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे कोणाही वाचकाच्या मनात त्या व्यक्तिविमर्शांचा सखोल ठसा उमटतो; इतका की ती व्यक्ती म्हणजे विनय हर्डीकरांच्या लेखात चित्रित झाली आहे तशीच असणार, असा समज त्या व्यक्तीला न ओळखणाऱ्यांचा होतो. आणि त्या व्यक्तीला आधीपासून ओळखत असणाऱ्या वाचकांना वाटते, आपल्याला आता कुठे ही व्यक्ती नीट समजली आहे.