साहित्य

Saleनवी पुस्तके

एक्स्प्रेस पुराण | Express puran

160.00

उपजत कुतूहल घेऊन विनय हर्डीकर अनेक क्षेत्रांत गेली पाच दशके विहार करत आहेत. या दरम्यान ते जिथे रमतात, तिथे खोल बुडी मारून तळ पाहून येतात. आणि कालांतराने काठाशी बसून तो अनुभव आपल्या वाचकांशी साद्यंत संवादतात. यातून त्यांची उत्कट आत्मनिवेदनात्मक शैली साकारलेली आहे.

1981 ते 1986 या काळात अशीच बुडी त्यांनी इंग्रजी पत्रकारितेत मारली होती, ‘इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तपत्रसमूहात फिरता शोधपत्रकार म्हणून. त्या अनुभवांचे पुराण ते इथे सांगत आहेत, अर्थात हे करताना आत्मनिष्ठ अनुभवकथनातून वर्तमानाचा इतिहास नोंदवण्याची बांधिलकी ते सोडत नाहीत.

या आग्रहातून आनंद, औत्सुक्य, फजिती, घालमेल, विषण्णता, रोमांच इत्यादी भावभावनांचा डौलदार स्वानुभव मांडतानाच ते तत्कालीन समाजातल्या आंतरसंबंधांची गुंतागुंत, भारतातल्या पत्रकारितेचे राष्ट्रीय व प्रादेशिक स्वरूप आणि इथल्या राजकीय-सामाजिक-आर्थिक व सांस्कृतिक निष्ठांचा अविरत सुरू असलेला झगडा यांचा (मर्यादित परंतु स्वयंपूर्ण) छेद वाचकांच्या जाणिवेत प्रतिरोपित करतात.

केला होता अट्टहास | Kela Hota Attahas

240.00

‘केला होता अट्टहास’ म्हणजे हिंदी साहित्यिक शिवदयाल यांच्या “एक और दुनिया होती” या कांदबरीचा अनुवाद.

कादंबरीचं कथानक अनेक व्यक्तिरेखांच्या परस्परसंबंधातून विणलं गेलं आहे आणि त्यात मुख्यतः अन्याय्य समाजव्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करणारे, परिवर्तनाचा ध्यास घेऊन आपलं आयुष्य खर्ची घालणारे, ‘समग्र क्रांती’च्या विचारांनी भारलेले तरुण आहेत. तरुणांची ही संघटना, कसेल त्याला जमीन देण्यासाठी जमिनींशी संबंधित लढ्यांमध्ये कार्यरत आहे. सत्तर ऐंशीच्या दशकातील चळवळींप्रमाणेच आजही जमिनींचे प्रश्न, विस्थापितांचे प्रश्न, आरक्षणांचे, बेकारांचे प्रश्न अशा वेगवेगळ्या कारणांनी चळवळी सुरूच आहेत. कधी स्थानिक पातळीवर तर कधी व्यापक स्वरूपात. यांच्या मुळाशी फक्त राजकारणच असतं. असंही नाही. म्हणूनच समकालीन वास्तवातही ही कादंबरी महत्त्वाची वाटते.

     

कैफियत | Kaifiyat

160.00
कैफियत (लेखसंग्रह) – माणूस, प्राणी, पक्षी आणि एकूणच निसर्गाची कैफियत मांडणारे आणि सभोवतालाकडे सजगतेने पाहायला शिकवणारे ललित लेख.

     

कोsहम | Ko ham

200.00
कोsहम (कादंबरी) – ‘मी कोण’ या प्रश्नापासून तत्त्वज्ञान सुरु होते, त्याचा वेध घेणारी ललितरम्य व उद्बोधक कादंबरी.

     

गांधींविषयी (खंड 1)-जीवन व कार्य | Gandhinvishyi (Khand 1)-Jeevan va Karya

480.00

गेल्या शंभर वर्षातील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले.हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधीः व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही, तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.

 

 

गांधींविषयी (खंड 2)-गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व | Gandhinvishyi (Khand 2)-Gandhivichar ani Samkalin Vicharvishwa

400.00

गेल्या शंभर वर्षांतील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले. हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे.

समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल, असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.

‘गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व’ या दुसऱ्या खंडामध्ये सॉक्रेटिस-टागोरांपासून ते आंबेडकर-लोहियांपर्यंत एका विशिष्ट विचारवंतांच्या विचारांच्या संदर्भात गांधी विचारांची चर्चा केली असल्याने गांधी विचारांच्या आकलनास एक व्यापक अशी संदर्भचौकट प्राप्त झाली आहे.

यातूनच आपल्याला आजच्या समस्या समजून घेऊन त्यांची सोडवणूक करण्यासाठी दिशा प्राप्त होणार आहे.

गुलामगिरीतून गौरवाकडे | Gulamgiritun Gauravakade

160.00

गुलामगिरीतून गौरवाकडे (आत्मचरित्र) – एका गुलामाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे अमेरिकेतील नामवंत शिक्षणतज्ञ झाला; त्याच्या ‘अप फ्रॉम स्लेव्हरी’ या आत्मकथनाचा हा अनुवाद. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील ‘गुलामांचे जगणे’ कसे होते ते दाखवणारे पुस्तक.

            

1 2 3 4 9