Sale

160.00

Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे

गुलामगिरीतून गौरवाकडे (आत्मचरित्र) – एका गुलामाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा पुढे अमेरिकेतील नामवंत शिक्षणतज्ञ झाला; त्याच्या ‘अप फ्रॉम स्लॅव्हरी’ या आत्मकथनाचा हा अनुवाद. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील ‘गुलामांचे जगणे’ कसे होते ते दाखवणारे पुस्तक.

            

Share

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलत: निग्रोंची- पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1.5 × 21.5 cm
Size

M, S

Pages

168

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Gulamgiritun Gauravakade | गुलामगिरीतून गौरवाकडे”

Your email address will not be published.