एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत नागरी युद्धानंतर गुलामगिरीची अधिकृतरीत्या समाप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या गुलामांना स्वावलंबी, सशक्त आणि स्वाभिमानपूर्वक जगण्यासाठी बुकर टी. वॉशिंग्टन यांनी अथक परिश्रम करून जे अतुलनीय कार्य केले त्याची हकिगत Up from Slavery या पुस्तकात आली आहे, त्या पुस्तकाचा हा अनुवाद आहे. रूढार्थाने बुकर टी. वॉशिंग्टन यांचे हे आत्मचरित्र नव्हे. The story of My life and work हे त्यांचे आत्मचरित्र १९०० मध्ये प्रसिद्ध झाले. १९०१ मध्ये आलेल्या Up from Slavery ची सुरुवात बरीचशी आत्मकथनात्मक असली तरी मूलत: निग्रोंची- पूर्वीच्या गुलामांची- अवस्था सुधारून त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी जे प्रयत्न झाले आणि त्याला समाजातून जो प्रतिसाद मिळाला त्याचे चित्रण या पुस्तकात केलेले आहे.
अवघी भूमी जगदीशाची | Avaghi Bhoomi Jagadishachi
₹440.00देशाला स्वातंत्र्य मिळाले, पण गांधीजींच्या स्वप्नातील ग्रामस्वराज्याचे काय हा प्रश्न अनिर्णित होता. त्या शोधप्रक्रियेचा भाग म्हणून 8 मार्च 1951 रोजी सर्वोदय संमेलन आणि तेलंगणाची यात्रा करायला विनोबा भावे निघाले. नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावातील बैठकीत तेथील दलितांच्या समस्यांवर चर्चा चालू होती. तेव्हा रामचंद्र रेड्डी या व्यक्तीने त्यांच्या मालकीची 50 एकर कोरडवाहू आणि 50 एकर ओलिताची जमीन दान करण्याची घोषणा केली. त्या घटनेने ठिणगी पडली, त्या रात्री विनोबा झोपू शकले नाहीत. तो दिवस होता 18 एप्रिल 1951.
आणि मग दुसऱ्या दिवशीपासून सुरू झाले भूदान आंदोलन, नंतर त्याला ग्रामदानाची जोड मिळाली. तब्बल 13 वर्षे त्या आंदोलनाचा झंझावात देशातील विविध राज्यांतून चालूच राहिला, आणखी दशकभर त्याचा प्रभाव देशभर राहिला. त्या प्रक्रियेत एकूण 47 लाख एकर जमीन मिळाली आणि त्यातील 25 लाख एकर जमीन भूमिहीन शेतमजुरांना वाटली गेली. या संपूर्ण प्रक्रियेची कहाणी, शिवाय त्या आंदोलनाचे आणखी काय, किती व कसे परिणाम झाले, या सर्वांची अतिशय अभ्यासपूर्ण आणि तरीही कमालीची वाचनीय व रोचक अशी समीक्षा या पुस्तकात आहे.
Reviews
There are no reviews yet.