साहित्य

Saleनवी पुस्तके

त्रिकोणी साहस | Trikoni Sahas

480.00

या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल…

Saleनवी पुस्तके

एक मैफल | Ek Maifal

60.00

ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.

 

Saleनवी पुस्तके

बिजली | Bijali

100.00

सामाजिक तत्त्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:

श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरूनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्त्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.

वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)

 

 

न पेटलेले दिवे | Na Petlele Dive

120.00
न पेटलेले दिवे (व्यक्तिचित्रे) – लेखकाला त्याच्या आयुष्यात भेटलेली अशी 14 लहान मुले-मुली जी खूप चमकदार होती, पण अकाली विझली.

     

स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास | Swaminathan : Bhukmukticha Dhyas

240.00
स्वामीनाथन : भूकमुक्तीचा ध्यास (चरित्र) – हरित क्रांतीच्या प्रणेत्यांपैकी एक असलेले कृषीवैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांचे व्यक्तित्व, विचार व कार्य यांचा वेध घेणारे पुस्तक.

     

मधुघट | Madhughat

160.00

मधुघट (लेखसंग्रह) – शेक्सपिअरवरील पाच आणि टॉलस्टॉय , झिवागो, रवींद्रनाथ, सुभाषबाबू, जेन ऑस्टिन इत्यादींवरील आठ अशा एकूण 13 लेखांचा संग्रह.

     

हे मित्रवर्या | He Mitravarya

100.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर रा. ग. जाधव सरांनी लिहिलेल्या 67 स्मृतिरचना, त्या दोघांतील भावबंध दाखवणाऱ्या आहेत.

     

दलपतसिंग येती गावा (नाट्यसंहिता) । Dalpatsingh Yeti Gava (Natyasanhita)

60.00

एका अर्थाने, हे राजकीय प्रचाराचं नाटक आहे, पण हे कमिशन्ड नाटक असलं तरी ते प्रचारनाट्य न करता विचारनाट्य होईल असाच माझा प्रयत्न होता. तिसरी गोष्ट म्हणजे कोणतंही नाटक, मग ते प्रचारनाट्य असो, विचारनाट्य असो वा अगदी मानवी भाव-भावनांना भिडणारं नाटक असो, ते उत्तम नाटक असलं पाहिजे. ते बुद्धीला तर भिडलं पाहिजेच, पण भावनांनाही भिडलं पाहिजे.

– मकरंद साठे (मुलाखतीतून)

     

1 3 4 5 9