Saptahik Sadhana Diwali 2024 | साप्ताहिक साधना दिवाळी 2024
₹140.00हा अंक तयार करताना दोन ते तीन हजार शब्दांचे लेख व वर्तमानाशी निगडित आशय-विषय आणि जास्तीत जास्त नवे लेखक अशी मध्यवर्ती कल्पना समोर ठेवली. ताज्या घटना-घडामोडींचे निमित्त करून हे 13 लेख प्रसिद्ध करीत आहोत.
Vidnyanane Mala Kay Dile | विज्ञानाने मला काय दिले
₹80.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.
Yuva Diwali Ank | युवा दिवाळी अंक
₹80.00या सर्व युवांच्या लेखनातून व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य या चार घटकांचे प्रतिबिंब दिसेल.
आजचे मास्टर्स | Aajache Masters
₹280.00गेल्या पंधरा-वीस वर्षांत जागतिक स्तरावर अनेक वेगवेगळे प्रयोग होताहेत. अनेक देशांत, अगदी अपारंपरिक देशांतसुद्धा. या आगळ्यावेगळ्या धडपडीची दखल घेतली जाते जगातल्या महत्त्वाच्या जागतिक चित्रपट महोत्सवांत. तिथे जोखली जातात नव्या संवेदनांची स्पंदनं, नव्या जाणिवा. कधी अंतर्मुख करणाऱ्या, तर कधी बराच काळ मेंदूला सुखद धक्का देणाऱ्या. कधी कधी काही चित्रपट त्यांच्या देशातल्या सामाजिक-राजकीय घडामोडी, मानवी समस्या, स्त्री-पुरुष संबंध, तरुणाईतले नाजूक अनुबंध, युद्धाचे घनघोर आघात आणि त्याचबरोबर राज्यसत्तेने आणलेली कलात्मक आविष्कारावरची तथाकथित नैतिक बंधनं या सगळ्या कलाबाह्य गोष्टींवर मात करीत मैलाचा दगड ठरतात. त्या कलाकृतींना कोणी नाही थांबवू शकत. इतकंच नव्हे, तर मागच्या काही क्लासिक्ससुद्धा माना डोलवून दखल घेतात. इथे भेटणाऱ्या दिग्दर्शकांनी उत्तम कलाकृती दिलेल्या आहेत यात शंकाच नाही. त्यांनी परंपरांचं ओझं झेलत, पडताळत मागच्या क्लासिक्सना अभ्यासत वाटचाल केलीय की या सगळ्या गोष्टी झुगारून देऊन स्वतंत्र वाटचाल केलीय हे वाचकांनी पारदर्शीपणे पाहायला हवं.
– डॉ. जब्बार पटेल (प्रस्तावनेतून)
मुळातच सिनेमाविषयी लिखाण करताना माझा मुख्य उद्देश हाच असतो. आपल्याला सिनेमाविषयी किती कळतं हे सांगणं मला महत्त्वाचं वाटत नाही. त्याऐवजी आपल्याला आवडलेल्या कलाकृतीविषयी लिहावं असं मला वाटतं. यातले अनेक सिनेमे सगळ्यांना पाहता येत नाहीत, त्यामुळे त्या सिनेमांची आणि सिनेमांच्या दिग्दर्शकांची साध्यासोप्या भाषेत ओळख करून द्यावी असं वाटतं. ते वाचून एखाद्या वाचकाला एखाद्या दिग्दर्शकाचा / दिग्दर्शिकेचा शोध घ्यावा वाटला, त्यांचं काम एक्सप्लोअर करावंसं वाटलं तरी खूप झालं की!
– मीना कर्णिक (मनोगतामधून)
गांधींविषयी (खंड 1)-जीवन व कार्य | Gandhinvishyi (Khand 1)-Jeevan va Karya
₹480.00गेल्या शंभर वर्षातील मराठी भाषेमधील गांधींविषयक गंभीर वैचारिक साहित्यातून आजच्या काळाच्या संदर्भात महत्त्वाचे ठरणारे लेख या प्रकल्पासाठी निवडले.हे अतिशय महत्त्वाचे आणि भावी काळाचा वेध घेणारे चिंतन आहे. समाजाविषयी आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी पुढील काही दशके उपयुक्त ठरू शकेल असा हा त्रिखंडात्मक ग्रंथरूपी खजिना आहे.
‘गांधीः व्यक्ती आणि विचार’ या पहिल्या खंडात टिळक-टागोर ते आजच्या काळातील चैत्रा रेडकर या पाच पिढ्यांतील विचारवंत आणि अभ्यासकांनी गांधीजींचे व्यक्तित्व आणि विचार यांचे फक्त आकलन मांडलेले नाही, तर गांधी विचारांची त्यांच्या त्यांच्या कालखंडातील प्रस्तुतताही अधोरेखित केली आहे.
चिनी महासत्तेचा उदय | Chinee Mahasattecha Uday
₹440.001949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे !
ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani
₹120.00यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!
ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.