न्या. म.गो.रानडे यांचे तीन ग्रंथ | Nya. M. G. Ranade Yanche Tin Granth
₹1,200.001842 ते 1901 असे 60 वर्षांचे आयुष्य न्यायमूर्ती रानडे यांच्या वाट्याला आले. त्यांच्या भाषणांचे व निबंधाचे संग्रह असलेले
1. Essays on Indian Economics.
2. Religious and Social Reforms.
3. Miscellaneous Writings.
हे तीन ग्रंथ 1896 ते 1906 या काळात प्रकाशित झाले होते.
मात्र या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद मराठीत यापूर्वी कधीच झाले नाहीत.
आता या तिन्हींचे अनुवाद अनुक्रमे
1. भारतीय अर्थकारणावरील निबंध.
2. धार्मिक व सामाजिक सुधारणा.
3. संकीर्ण निबंध.
या तीन शीर्षकांखाली साधना प्रकाशनाकडून आले आहेत. अवधूत डोंगरे यांनी या तिन्ही ग्रंथांचे अनुवाद केले आहेत.
या तीन अनुवादित ग्रंथांना अनुक्रमे नीरज हातेकर, अरविंद गणाचारी व अभय टिळक यांनी विवेचक प्रस्तावना लिहिल्या आहेत.
या लेखनाचे त्या काळातील महत्त्व आणि आजच्या काळातील उपयुक्तता यांचा वेध घेण्याचा प्रयत्न तिन्ही प्रस्तावनाकारांनी केला आहे
Vidnyanane Mala Kay Dile | विज्ञानाने मला काय दिले
₹80.00डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टीकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.
ज्वारीची कहाणी | Jwarichi Kahani
₹120.00यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्या वतीने, 2022 या वर्षी मराठीतील ललित, वैचारिक, साहित्य प्रकारांत तीन तरुणांना अभ्यासवृत्ती प्रदान केली होती, त्यातील एक होता धनंजय सानप. या तरुणाने निवडलेला विषय होता ‘ज्वारी पिकाचा अभ्यास’. साधारणतः एक वर्षभर त्याने लायब्ररी वर्क आणि फिल्ड वर्क केले, त्यातून आकाराला आलेले हे पुस्तक आहे. अतिशय सुबोध पद्धतीने ज्वारी या पिकाची कहाणी त्याने सांगितली आहे. यामध्ये इतिहास आहे, वर्तमानही आहे आणि भविष्यातील वाटचालीसाठी दिशादर्शनही!
ज्वारी पिकाच्या संदर्भातील सर्व प्रमुख आयाम या पुस्तकातून पुढे येतात. त्यामुळे शेतकरी, राज्यकर्ते, धोरण आखणारे व ते राबवणारे आणि अर्थातच शेतीशी निगडित अभ्यास संशोधन करणारे यांना हे पुस्तक विशेष उपयुक्त वाटेल. मात्र सर्वसामान्य व जिज्ञासू मराठी वाचकांनाही हे पुस्तक रंजक व उद्बोधक वाटेल. कारण महाराष्ट्राच्या दैनंदिन जीवनातील मुख्य आहारात (ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ) ज्वारीचे स्थान अग्रभागी आहे.
मानवजातीची कथा | Manavjatichi Katha
₹320.00या पुस्तकात इतिहासातील महत्त्वाच्या घडामोडी मांडल्या आहेत. त्या-त्या घडामोडीतील महत्त्वाच्या व्यक्तींभोवती त्या-त्या घडामोडी रंगविल्या आहेत. या जगात स्थूल दृष्टीने दोन प्रकारचे नेते आढळतात :
संस्कृती व सुधारणा यांना पुढे नेणारे आणि त्यांना मागे खेचणारे. शांतीचे पुरस्कर्ते पहिल्या वर्गात येतात. युद्धे पेटविणारे दुसऱ्या वर्गात येतात. जे मोठमोठे धर्मसंस्थापक होऊन गेले, त्यांनी ‘शांतीनेच खरी प्रगती होते’ या तत्त्वावरील आपली श्रद्धा आपल्या जीवनात उत्कटपणे दाखविलेली आहे. इतिहासाचे नीट निरीक्षण केल्यास आपणास कबूल करावे लागेल, की धर्मसंस्थापकांची ही श्रद्धा यथार्थ आहे. ही श्रद्धा म्हणजे केवळ धर्मग्रंथांतील आशावाद नव्हे; ही श्रद्धा स्वतः सिद्ध असे इतिहासातील एक सत्य आहे.
‘शांतीचे दूतच पृथ्वीचे वारसदार होतील’ हा दृष्टिकोन ‘मानवजातीची कथा’ हे पुस्तक लिहिताना डोळ्यांसमोर आहे.
Saptahik Sadhana Diwali 2024 | साप्ताहिक साधना दिवाळी 2024
₹140.00हा अंक तयार करताना दोन ते तीन हजार शब्दांचे लेख व वर्तमानाशी निगडित आशय-विषय आणि जास्तीत जास्त नवे लेखक अशी मध्यवर्ती कल्पना समोर ठेवली. ताज्या घटना-घडामोडींचे निमित्त करून हे 13 लेख प्रसिद्ध करीत आहोत.
Yuva Diwali Ank | युवा दिवाळी अंक
₹80.00या सर्व युवांच्या लेखनातून व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य या चार घटकांचे प्रतिबिंब दिसेल.
चिनी महासत्तेचा उदय | Chinee Mahasattecha Uday
₹440.001949 मध्ये माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये क्रांती झाली. आणि 1978 मध्ये डेंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने नवे वळण घेऊन महासत्ता होण्याच्या दिशेने पावले टाकायला सुरुवात केली. त्यानंतरच्या चाळीस वर्षात चीनने अर्थव्यवस्था अधिकाधिक खुली करीत जोमाने आर्थिक विकास साधला. कोट्यवधी गरीब लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढून मानाने जगायला शिकविले.जलद आर्थिक विकासामुळे चीनने आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत मनाचे स्थान प्राप्त केले खरे !