रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू १९९५ साली झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. २५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण. हे लिखाण फक्त स्मरणरंजनासाठी नसून त्यात एका धडपडणाऱ्या कार्यकर्त्यांचा सामाजिक आणि वैयक्तिक प्रवास चित्रित झाला आहे. रमेशचे मित्र, सोबतचे कार्यकर्ते आणि कुटुंबीय यांनी सांगितलेल्या या आठवणींमधून रमेशचा हरहुन्नरी स्वभाव, जगण्याचा अनेक अंगांनी आस्वाद घेण्याची त्यांची असोशी आणि त्याचबरोबर समाजातल्या साध्या माणसांच्या सुखदुःखाशी जोडून घेऊन काम करण्याची त्यांची तळमळ यांचं या पुस्तकात मनोज्ञ दर्शन घडतं. एक सामाजिक कार्यकर्ता आपल्याला मिळालेल्या छोट्याश्या आयुष्यात जगण्याला किती अंगांनी भिडू शकतो याचंही एक रसरशीत उदाहरण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं.
Islam Aani Sahishnuteche Bhavitavya | इस्लाम आणि सहिष्णुतेचे भवितव्य
₹120.00उच्च शिक्षण पूर्ण करून नवाझ यांनी इंग्लंडमध्ये क्विलिअम ही संस्था स्थापन केली आहे, त्याद्वारे ते इस्लाममधील आणि मुस्लिमांमधील कट्टरता दूर व्हावी, या दृष्टीने संघटित प्रयत्न करत आहेत. उदारमतवाद, मानवतावाद, स्त्री-पुरुष समानता, व्यक्तिस्वातंत्र्य यांना इस्लाममध्ये स्थान मिळावे यासाठी ते झगडत आहेत. त्यांच्या या कार्याला पाठिंबा देण्यासाठी सॅम हॅरिस त्यांच्याबरोबर खुली चर्चा करत आहेत. हे पुस्तक म्हणजे त्या दोघांनी केलेल्या चर्चेचे शब्दश: परिलेखन आहे.
Reviews
There are no reviews yet.