८ ऑगस्ट १९४२ च्या त्या ऐतिहासिक सभेत चौघांची भाषणे झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर मौलाना अबुल कलाम आझाद होते, त्यामुळे त्यांचे भाषण सर्वप्रथम झाले. नंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेस कार्यकारिणीचा ठराव सभेपुढे वाचून दाखवला आणि ठरावाचे समर्थन करणारे भाषण केले. त्यानंतर त्या ठरावाला अनुमोदन देणारे भाषण सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. आणि मग महात्मा गांधी यांनी, ‘हा ठराव सभेने मंजूर करावा’ असे आवाहन करणारे प्रास्ताविक भाषण केले. ठरावाला उपस्थित प्रतिनिधींची मंजुरी मिळाल्यानंतर गांधीजींनी लढ्यामागची कारणमीमांसा आणि पुढची दिशा यांवर हिंदीतून मुख्य भाषण केले.. आणि समारोपाचे भाषण इंग्रजीतून केले. ही तिन्ही भाषणे मिळून गांधीजी जवळपास सव्वादोन तास त्या सभेत बोलले. सायंकाळी ६ वाजता सुरू झालेली ती सभा रात्री १० पर्यंत चालली होती.
Sale
₹80.00
Chale Jao – 1942 Chya Tharawawaril Bhashne | चले जाव – 1942 च्या ठरावावरील भाषणे
चले जाव (भाषणसंग्रह) – ८ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे ‘चले जाव’ ठराव मंजूर झाला, त्या सभेत गांधींनी केलेली तीन भाषणे आणि नेहरू, पटेल, आझाद या तिघांचे एक भाषण संकलित करण्यात आले आहे. ही ऐतिहासिक भाषणे पहिल्यांदाच पुस्तकरूपाने एकत्रितपणे प्रसिद्ध झाली आहेत.
Weight | 0.1 kg |
---|---|
Dimensions | 14 × 0.5 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 72 |
Reviews
There are no reviews yet.