या विस्तृत जीवनाचा विचार करत असताना लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे इथं काही आपण तेवढेच नाही. आपल्यापेक्षा भिन्न प्रकृतीची माणसंही इथं आहेत, प्राणीमात्रही आहेत.. त्यांचा नफा-तोटा आणि आपला नफा-तोटा एकमेकांत गुंतले आहेत हे आपण जाणलं पाहिजे. आपल्या कितीतरी इच्छा पूर्ण होत नाहीत. इतरांच्या लाभामध्ये त्याचा अडसर झाल्यामुळे असं घडत आहे. इतरांचे लाभ आपल्यासारख्या एकट्या-दुकट्यांच्या अपेक्षा मोडून काढण्याइतके बलिष्ठ असतात. त्यामुळे आपले प्रयत्न व्यर्थ गेले म्हणून गळा काढायची गरज नाही. जगात जगत असताना शेकडो वेळा हार पत्करल्यानंतर एक-दोन दशाचे प्रसंग कदाचित येतील. जीवन-संग्रामात जगण्याबरोबरच हरण्यालाही तितकंच महत्त्व आहे.. हरण्यातूनच जीत शक्य होत असते. हे जाणून घेतलं तर आपल्या विस्तृत जीवनातील कल्पना आणि कृती कधीही निरर्थक भासणार नाहीत. त्या आपलं जीवन उजळून टाकतात. मी जगण्यासाठी कष्ट घेतले आहेत, माझ्याकडून शक्य होतं ते सगळं मी केलं आहे, अशी तृप्ती आपल्या जीवनातून आपल्याला मिळाली पाहिजे. या लेखनातून व्यक्त झालेले अभिप्राय हेच माझं जीवनाविषयीचं अंतिम चिंतन असा निष्कर्ष काढू नये. आजवरच्या माझ्या जीवनातील अनुभवांचं हे सार आहे. पुढील जीवन या अभिप्रायांवर संस्कार करू शकेल, एवढंच काय बदलही घडवू शकेल. जोपर्यंत जीवन हाथ सत्याचा शाश्वत शोध घेण्याचा मार्ग आहे, तोपर्यंत हे अभिप्राय व्यर्थ नाहीत. ‘सत्य’ ही विशिष्ट काळाच्या तुलनेनुसार बदलणाऱ्या जीवनाविषयीची जाणीव आहे…
₹200.00 ₹160.00
Karant Chintan | कारंत चिंतन
Weight | 0.15 kg |
---|---|
Dimensions | 14 × 1 × 21.5 cm |
Size | M, S |
Pages | 110 |
Related products
Ughada, Darwaje ughada…! । उघडा, दरवाजे उघडा…!
हिंदीतील प्रसिद्ध लेखक कृष्ण चंदर यांचे ‘दरवाज़े खोल दो’ या मूळ उर्दू नाटकाचा मराठी अनुवाद लेखक भारत सासणे यांनी केला आहे.
श्यामचा जीवनविकास । Shyamcha Jivanvikas
‘श्यामचा जीवनविकास’ या पुस्तकात मॕट्रिकचे वर्ष आणि महाविद्यालयीन शिक्षणाची तीन वर्ष हा वय वर्ष 19 ते 22 हा कालखंड आला आहे. पण हा कालखंड पूर्ण आणि विस्ताराने येत नाही.
पुणे येथे शिक्षणासाठी गुरुजींनी सोसलेले कष्ट, मृदू, सोशिक आणि संकोची गुरुजींचे अनुभव, त्यांचे भावविश्व व विचारविश्व हे सर्व यामधे आले आहे.
Sane Guruji : Vyakti Aani Vichar | साने गुरुजी : व्यक्ती आणि विचार
साने गुरुजींच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील घटनांचा परस्परांशी मेळ घालत, त्या घटनांना एकमेकांच्या प्रकाशात न्याहाळत साने गुरुजींना आणि त्यांच्या भूमिकांना समजून घेण्याचा आणि त्याद्वारे साने गुरुजींच्या वैचारिक चारित्र्याचा पट उलगडण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे.
हाजीपीर आणि कांजरकोट | Hajipeer Ani Kanjarkot
पंजाब व जम्मू-काश्मीरमध्ये आणि युद्ध आघाडीवरील विभागात फिरताना जे पहिले, ते अनुभव लिहून ठेवावे असे ठरवले. त्या काळाचा आमच्या सर्वांच्या मनावर जो संस्कार घडला, तो कधी पुसला जाणार नाही. त्यामुळे हे निवेदन प्रसिद्ध करावेसे वाटले.
Shyamchi Aai | श्यामची आई
अमृताशी पैजा जिंकण्याचे सामर्थ्य आपल्या मराठी भाषेत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले, पण वाटेल त्यांच्या मुखातून किंवा लेखणीतून निघालेली मराठी भाषा अमृताशी थोडीच पैजा जिंकू शकणार आहे? ते सामर्थ्य जसे ज्ञानेश्वरांच्या ‘ज्ञानेश्वरी’मध्ये आहे, तसे गुरुजींच्या ‘श्यामची आई’ मध्येही आहे.
-आचार्य अत्रे
Reviews
There are no reviews yet.