मराठी ख्रिस्ती समाजातील अनुभवविश्वाचं व विचारांचं सुबोध ललित शैलीत प्रत्ययकारी चित्रण करणारं हे पुस्तक. या पुस्तकाच्या केंद्रस्थानी ख्रिस्ती धर्म आणि विवेकवाद या संदर्भातील चर्चा आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाल्यानंतर डॅनिअलच्या मनात या लेखनाचे बीज पडले. भाषा प्रवाही, मांडणी सुबोध आणि युक्तिवाद तर्कशुद्ध असे हे लेखन आहे. एका अर्थाने धाडसीसुद्धा!
जून 2018 ते जून 2019 या वर्षभरात साधना साप्ताहिकातून ‘मंच’ ही लेखमाला प्रसिद्ध झाली आणि जानेवारी 2020 मध्ये कुमार केतकर यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले.
विशेष म्हणजे, या पुस्तकाला राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा 50 हजार रुपये व स्मृतिचिन्ह असा ताराबाई शिंदे यांच्या नावाचा 2020 चा ललित गद्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
मेळघाट : शोध स्वराज्याचा | Melghat : Shodh Swarajyacha
₹200.00आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.
Reviews
There are no reviews yet.