मुकुंद टाकसाळे यांनी ‘वाङ्मयवृत्त’ या मासिकासाठी ‘तिरपागड’ आणि ‘साधना’ साप्ताहिकासाठी ‘मुका म्हणे…’ या नावाने सदरे लिहिली, त्यांतील निवडक ललित लेखांचा हा संग्रह आहे. वर्तमानातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटना-घडामोडींच्या निमित्ताने केलेले हे लेखन आहे. या लेखनासाठी निवडलेले विषय गंभीर आणि गमतीदार आहेत, सामाजिक दृष्टीने विशेष महत्त्वाचे आहेत. ललितरम्य व नर्मविनोदी पद्धतीने केलेल्या या लेखनाला वैचारिकतेची डूब आहे, ही वैचारिकता रॅशनॅलिटीच्या दिशेने जाणारी आहे. चिं. वि. जोशी, पु.ल.देशपांडे, जयवंत दळवी या विनोदी लेखकांच्या परंपरेशी टाकसाळे यांच्या लेखनाचे नाते आहेच, पण त्यांचे असे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. विनोदी शैलीत केलेल्या ललित लेखनामध्ये काहीएक निश्चित व निर्णयात्मक भूमिका आहे, असे उदाहरण मराठीत अपवादात्मक दिसते, मुकुंद टाकसाळे यांचे लेखन अशा अपवादांपैकी आहे.
विनोद शिरसाठ
संपादक, साधना
Reviews
There are no reviews yet.