त्रिकोणी साहस | Trikoni Sahas
₹480.00या पुस्तकाची कथा सुरू होते पृथ्वीपासून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ‘श्वेतालिया’ नावाच्या परग्रहावर. या श्वेतालियाच्या सूर्यमालेत एक नव्हे, तर तब्बल चार सूर्य आहेत! या ग्रहावर ‘साहस श्वेतम’ नावाचा एक मुलगा राहतो, जो आपल्या 12 वर्षांच्या आयुष्यात (इच्छा असूनही) कधीही आपल्या शहराबाहेर गेलेला नाहीये. त्याच्या 12 व्या वाढदिवशी त्याला एक गूढ संदेश मिळतो आणि त्या संदेशाचा पाठपुरावा करताना तो अनेक नवनवीन रहस्यांमध्ये गुंतत जातो, अनेक अद्भुत प्रदेशांत जाऊन अनेक नवनवीन संकटांचा सामना करतो. या शोधमोहिमेत त्याला नवीन मित्रही मिळतात अन् शत्रूही. आजवर कधीही न अनुभवलेले नवीन खेळ, कला, कोडी (पझल्स), संगीत, नृत्य, खाद्यपदार्थ, भाषा, संस्कृती यांचा त्याला परिचय होतो. विश्वातील नवनवीन प्रदेशांत भ्रमंती करणारा साहस आपल्या साहसी कृत्यांनी एक दिवस संपूर्ण विश्वाला तारणार आहे की आपल्या उतावळ्या, उपद्व्यापी वृत्तीने गंभीर संकटे ओढवून घेऊन संपूर्ण विश्वाला मारणार आहे. तो नक्की काय करतो ते पुस्तकात वाचणेच योग्य ठरेल…
१५५ सदाशिव पेठ, सातारा | 155 Sadashiv Peth, Satara
₹300.00कुटुंबसंस्थेमुळे भारतीय समाज टिकून राहिला, हे सर्वांनी मान्य केले आहे. अगदी विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत महाराष्ट्रात आणि देशात अनेक कर्तृत्ववान कुटुंबे पाहायला मिळतात.
साताऱ्याचे दाभोलकर हे महाराष्ट्रातले एक असे प्रमुख कुटुंब. महाराष्ट्राचा सामाजिक-सांस्कृतिक इतिहास लिहिताना दाभोलकरांची दखल घ्यावीच लागते.
या कुटुंबातील अनेकांशी माझा सहज योग जुळून आला. अगदी अलीकडेपर्यंत या मंडळींचे दर दोन वर्षांनी संमेलन भरत असे; त्यातही एकदा मी थोडा सहभागी झालो होतो. हे कुटुंब एकत्र राहिले याचे श्रेय माई आणि देवदत्त यांच्याइतकेच इतरांनाही आहे.
आपल्या देशात एकत्र कुटुंबे राजकारण, शिक्षण, उद्योग, व्यापार, वैद्यक या क्षेत्रांत बहुसंख्येने आहेत. मात्र प्रत्येक कुटुंब एकाच क्षेत्रात असते. दाभोलकर कुटुंबाचे उलट आहे.
तत्त्वज्ञान, विज्ञान, अर्थशास्त्र, शिक्षण, शेती, वैद्यक, मूलभूत संशोधन, संस्कृती, समाजप्रबोधन आणि परिवर्तनाच्या चळवळी इतक्या विविध क्षेत्रांत ठसा उमटवणाऱ्या दाभोलकर कुटुंबाचे साम्य एकोणिसाव्या शतकामधल्या रवीन्द्रनाथ टागोरांच्या कुटुंबाशीच आहे. त्यामुळे भानू काळे आणि अनिल जोशी यांनी दाभोलकर परिवाराचे विविधरंगी दर्शन घडवणाऱ्या या पुस्तकाचे संपादन करून मराठी साहित्याची श्रीमंती वाढवली आहे.
विनय हर्डीकर
सोन्याची मग होईल धरणी | Sonyachi Mag Hoil Dharani
₹250.00या पुस्तकाचे शीर्षक मी बा. भ. बोरकर यांच्या बालपणी वाचलेल्या आणि माझ्या विशेष स्मरणात राहिलेल्या, ‘गड्यांनो तृणबाळे होवू’ या कवितेमधून घेतले आहे.
कवितेमधील ‘सोन्याची मग होईल धरणी’ ह्या ओळीने मला खूप प्रभावित केले. कारण मी जरी तृणपात्याइतका लहान असलो तरी, या धरतीला सोन्याची करण्याचा माझा संकल्प कायमच दृढ होता. त्यासाठी लागणारी नैतिक, सामाजिक आणि बौद्धिक बांधिलकी प्रत्येक येणाऱ्या दिवसाबरोबर वाढविण्यासाठी मी झटायला तयार होतो/आहे.
पण असे विश्व किंवा अशी धरती सोन्याची करायची असेल तर जगाची वस्तुस्थिती समजण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हेसुद्धा जरुरीचे असते. शिवाय सभोवतालच्या परिस्थितीचे सातत्याने परीक्षण करताना आत्मपरीक्षण करणेसुद्धा तितकेच जरुरीचे असते.
‘परीक्षण आणि आत्मपरीक्षण’ हे पुस्तकाचे उपशीर्षक नेमकी हीच गोष्ट सुचविते. या पुस्तकात कविता, राजकारण, थोर विचारवंतांचे विचार व त्या विचारांना साकारताना त्यांनी केलेले संघर्ष आणि उच्च शिक्षणाची जगातील व भारतातील सद्यःस्थिती इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण लेख आहेत.
बाभळीच्या बाया | Babhalichya Baya
₹200.00“प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी ‘सुरवंट ‘मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या… कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं… अगदी माझ्या बायांसारखं”
रानडे, गांधी आणि जीना | Ranade, Gandhi ani Jinnah
₹200.00डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 18 जानेवारी 1943 रोजी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त पुण्यात इंग्रजीतून एक भाषण दिलं. ते त्याच वर्षी एप्रिल महिन्यात ‘रानडे, गांधी अँड जीना’ या पुस्तकाच्या रूपात प्रकाशित झालं. त्या संपूर्ण पुस्तकाचं हे नवीन मराठी भाषांतर आहे.
या भाषणाच्या शीर्षकात तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची नावं असली तरी, प्रत्यक्षात हे भाषण त्या व्यक्तींपेक्षा डॉ. आंबेडकरांच्या आस्थेचे प्रश्न आणि त्याबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन साररूपात मांडणारं आहे. म्हणजेच आंबेडकरांच्या विचारविश्वाचा गाभा या भाषणात सापडतो. इतिहासाची जडणघडण आणि त्यामधील मानवी कर्तेपणाचं स्थान, राजकीय आणि सामाजिक लोकशाहीचा विचार, सामाजिक सद्सद्विवेकबुद्धी, श्रेणीबद्ध विषमतेच्या रूपातील जातिव्यवस्था, माध्यमांचा व्यवहार, धर्माचं मानवी जीवनातलं स्थान, या विषयांसोबतच उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद, हिंदुत्ववाद इत्यादी विचारसरण्यांबद्दलची आंबेडकरांची मतंही या भाषणातून वाचायला मिळतात.
या भाषणाच्या अनुषंगाने आंबेडकरांच्या विचारव्यवहारातील धागेदोरे जोडून काहीएक आकृती स्पष्ट करण्याचा प्रयत्न सविस्तर विवरणात्मक टिपांमधून केला आहे. आंबेडकरांच्या भाषणात येणाऱ्या विपुल संदर्भाचे स्रोत नोंदवणं, तसंच त्यांनी या भाषणात नोंदवलेल्या मुद्द्याची त्यांच्या इतर विचारव्यवहाराशी कशी सांगड बसते याची उकल करणं, आणि त्यातील वाद-संवादाच्या शक्यतांना सामोरं जाण्याचा प्रयत्न करणं, अशा उद्देशाने या टिपा लिहिल्या आहेत.
निवेदन | Nivedan
₹200.001876 ते 1947 असे 70 वर्षांचे आयुष्य धर्मानंद कोसंबी यांना लाभले. त्यांचा जन्म गोव्यात झाला तर मृत्यू सेवाग्राम आश्रमात. वयाच्या ऐन पंचविशीत ते बुद्धी प्रेमाच्या आणि बुद्ध धर्माच्या शोधात घराबाहेर पडले.
पुढील दीड दशकांत त्यांनी पुणे, ग्वाल्हेर, काशी, नेपाळ, गया, मद्रास, श्रीलंका, म्यानमार, कलकत्ता, इंदौर, सिक्कीम, बडोदा, अमेरिका असा प्रवास केला.
ते प्रवास आणि तोपर्यंतचे त्यांचे आत्मकथन म्हणजेच हे निवेदन. कमालीचे वाचनीय आणि थक्क करणारे, अचंबित करणारे.
हे पुस्तक 1924 मध्ये पहिल्यांदा प्रकाशित झाले.
शंभर वर्षे झाली त्याला. त्या निमित्ताने, आणि त्यांचे 150 वे जयंती वर्ष 9 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झाले, त्या निमित्तानेही आणलेली ही नवी आवृत्ती…!




