Mala Prabhavit Karun Gelela Cinema। मला प्रभावित करून गेलेला सिनेमा
₹200.00मला प्रभावित करून गेलेला सिनेमा (लेखसंग्रह) – सिनेमातील लोक, सिनेमाचे समीक्षक आणि साहित्यिक अशा तीन घटकांतील २७ व्यक्तींनी त्यांना प्रभावित करून गेलेल्या प्रत्येकी एका सिनेमाविषयी लिहलेले लेख.
Mala Prabhavit Karun Gelele Pustak | मला प्रभावित करून गेलेले पुस्तक
₹160.00या पुस्तकातून अशा निष्कर्षाप्रत सहज येता येईल की, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळी पुस्तके प्रभाव टाकून जाऊ शकतात. यातून ‘वाचनाचे’ व अधिक चांगल्या वाचनाचे महत्त्व अधोरेखित होते. शिवाय, अभिजात किंवा संशोधनपर किंवा अस्सल जीवनानुभव सांगणारी किंवा अद्भुत अनोखे विश्व दाखवणारी किंवा कल्पकता प्रतिभा यांना बढावा देणारी पुस्तके, प्रभाव टाकून जाण्याची क्षमता जास्त बाळगून असतात. म्हणजे तशी पुस्तके वाचण्याची सवय असेल तर आपला सभोवताल समजून घेण्यासाठी ती विशेष उपयुक्त ठरतात!
ही गुणवैशिष्ट्ये तरुणाईच्या संदर्भात अधिक महत्त्वाची ठरू शकतात. कारण त्यांचे मानस अशाच मार्गदर्शकांच्या किंवा बियाण्यांच्या शोधात असते. अर्थातच हे एक सर्वपरिचित साधे सत्य आहे, पण प्रयोगातून पुढे आलेले! म्हणून याचे महत्त्व अधिक!
सारांश, हे पुस्तक वाचनाची सवय असलेल्या, बन्यापैकी राजकीय-सामाजिक भान आलेल्या व ‘स्व’ची जाणीव झालेल्या तरुणाईला अंधुक का होईना दिशा दाखवणारे वाटू शकेल.
Manvantar | मन्वंतर
₹140.00मन्वंतर (लेखसंग्रह) – आपल्या समाजाचा प्रवास समूहाकडून स्वतःकडे होत असताना काय स्थित्यंतरे झाली व काय होत आहेत, या विषयीचे वैचारिक लेख.
Mazi Katemundharichi Shala । माझी काटेमुंढरीची शाळा
₹140.00माझी काटेमुंढरीची शाळा (आत्मकथन) – गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील खेडेगावातील एका शिक्षकाची आत्मवृत्तात्मक कादंबरी.
Melghat : Shodh Swarajyacha | मेळघाट : शोध स्वराज्याचा
₹160.00आपले गाव हे एक कुटुंब आहे असे समजून त्यातील प्रत्येक व्यक्तीची कदर करायची, आपल्या गावापलीकडेही एक मोठा समाज आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी नातेसंबंध जोडायचे आणि ह्या सर्वांमधून आपले जगणे अधिक अर्थपूर्ण करायचे- अशी कामना आहे. ह्यालाच स्वराज्य असे म्हणतात. स्वराज्य हे साधन आहे आणि साध्यही. हे प्रत्यक्षात कसे करता येईल, त्यामध्ये कोणत्या अडचणी येतील, त्या अडचणींचे निराकरण कसे करायचे ह्याचा शोध म्हणजे स्वराज्याचा शोध.
MI BHARUN PAVALE AHE। मी भरून पावले आहे
₹200.00मी भरून पावले आहे (आत्मचरित्र) – साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा दलवाई यांनी त्यांच्या दोन दशकांतील सहजीवनाचे केलेले प्रांजळ आत्मनिवेदन.