Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat | पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात
₹300.00विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टीक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.
Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक
₹60.00आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.
Poshindyache Aakhyan | पोशिंद्याचे आख्यान
₹280.00शेतीचा प्रश्न हा प्रामुख्याने राजकीय आहे. तसेच तो फक्त शेतकऱ्यांच्या जीवन-मरणापुरताच मर्यादित नाही, याची जाणीव शेती उत्पादनावर जगणाऱ्या प्रत्येक समाजघटकाला व्हावी लागेल. जगाच्या इतिहासात अशा जाणिवेचे दाखले मोजकेच आहेत; आणि वर्तमान तर निराशाजनक आहे. त्यामुळे शोषणाच्या या दुष्टचक्रात भरडून निघण्याची वेळ प्रत्येकावर येणे निश्चित आहे. शेतकरी जात्यात आहे. तर शहरं सुपात. शेतीच्या गंभीर प्रश्नाचे वास्तव समजून घेतले तर कदाचित ती वेळ टळेल!
अशा परिस्थितीत ग्रामीण भवतालाची जाण असलेला, शेतकरी व शेती यांच्याबद्दल डोळस आस्था असलेला आणि अभ्यास करून लिहिणारा पत्रकार, शेतीच्या उपभोक्तावर्गाला आणि शेतकऱ्यांना महत्त्वाचे इनपुट्स देऊ शकतो. रमेश जाधव या तरुण पत्रकाराच्या अशा लेखांचा हा संग्रह आहे.
गेल्या पाच वर्षांतील शेतीप्रश्नाचे वास्तव या लेखांतून मांडले आहे. सत्तेवर येण्यापूर्वीची आश्वासने आणि निवडून आल्यानंतर सरकारची प्रत्यक्ष कृती यातील तफावत, अनेक बाजूंनी तपासून पाहिली आहे. थेट शेतीविषयक घटनांशिवाय मराठा आरक्षण, अण्णा हजारेंचे आंदोलन, गोवंशहत्याबंदी इत्यादी घडामोडींवर चर्चा करताना मूळ विषयाचा विस्तृत पट उभा राहतो. आकडेवारी आणि तांत्रिक तपशिलांसह लेखकाने घेतलेल्या रोखठोक भूमिकांमुळे मांडणीत नेमकेपणा आला आहे. भाषेतील संयमित उपरोधातून लेखकाची साहित्याची जाण दिसून येते. तात्कालिक घटनांच्या संदर्भातून शेतीच्या मूलभूत समस्यांची ललित भाषाशैलीने पुनर्मांडणी करणारा हा दस्तऐवज आहे.
– विनय हर्डीकर
Prashna Tumcha Uttar Dabholkaranche । प्रश्न तुमचा उत्तर दाभोलकरांचे
₹80.00हत्या झाली त्याच्या चार महिने आधी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची १०० मिनिटांची मुलाखत घेण्यात आली होती. त्यांना सर्वत्र विचारले जाणारे ते २५ प्रश्न आणि त्यांची दाभोलकरांनी मुलाखती दरम्यान दिलेली उत्तरे यांचा समावेश या पुस्तिकेत आहे.