भारतीय भाषा आणि साहित्य (लेखसंग्रह) – भारतीय संविधानाने 22 भाषांना ‘राजभाषा’ अशी मान्यता दिली आहे. त्या सर्व भाषा आणि त्यांतील साहित्य यांचा परिचय करून देणाऱ्या लेखांचा संग्रह.
हिंदभक्त विदेशिनी (व्यक्तिचित्रे) – विदेशातून आलेल्या आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या मेरी कार्पेन्टर, ॲनी बेझंट, मीरा बहन इत्यादी 11 महिलांची ओळख करून देणारा लेख.
सत्यकथा : अन्यायाच्या आणि संघर्षाच्या (व्यक्तिचित्रे) – तळागाळातल्या समूहांची बाजू उचलून धरणाऱ्या एका वकिलाने, त्याच्या संपर्कात आलेल्या सामान्य माणसांच्या लिहिलेल्या खऱ्याखुऱ्या कथा.