बापू : एकभाषित चिंतनकाव्य | Bapu : Ekbhashit Chintankavya
₹100.00बापू : एकभाषित चिंतनकाव्य (स्मृतिरचना) – महात्मा गांधी यांच्या जीवनातील 77 प्रसंगांना शब्दरूप देताना रा. ग. जाधव सरांनी 70 वर्षे मनाच्या कोपऱ्यात दडलेले संचित बाहेर काढले आहे.
बाभळीच्या बाया | Babhalichya Baya
₹200.00“प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वच लोकांना हे वाटत होतं की, मी तिथे नोकरीला लागल्याने माझ्या बायांच्या आयुष्यात खूप फरक पडलाय, त्यांची प्रगती झालीये, त्यांचं भलं झालंय. पण हे पूर्ण सत्य नाहीये. लेखमालिकेत निसटून गेलेला माझ्या जडणीघडणीचा भाग मी या पुस्तकात मांडलाय. जेवढा परिणाम माझ्यामुळे त्यांच्या आयुष्यात झाला, त्यापेक्षा कैकपटीने जास्त माझ्या आयुष्यात झाला. आत्मसन्मान आणि नैराश्याने भरलेल्या माझ्या आयुष्याला त्यांनी पाठीचा कणा दिला, संघर्षाचं बळ दिलं. माझा अतिशय खचलेला, आतला पैलू मी ‘सुरवंट ‘मधून मांडलाय. ते लिहिताना मला धाडस लागलं, पोटात कालवाकालव झाली, पण वाटलं लिहू या… कारण हा प्रवास केवळ माझ्या बायांचाच नव्हता. आमच्या विदर्भात सर्वांत कोरड्या, उष्ण भागातही जे झाड तग धरून उभं राहतं ते म्हणजे बाभूळ. त्याला स्वतःचं अस्तित्व टिकवता येतं… अगदी माझ्या बायांसारखं”
बारा गावचं पाणी | Bara Gavcha Paani
₹120.00काही गर्भश्रीमंत काही नवश्रीमंत, काही राजाश्रयावर माजलेली, काही लोकाश्रयावर! काही काही केले तरी दरिद्रीच वाटणारी! काही चिरतरुण, चिरसुंदर, चिरसस्मित प्रत्येकाचा वेगळा सूर, वेगळा नूर. प्रत्येकाचा वेगळा गंध, वेगळा छंद… या गावांचे वेगवेगळे पाणी मला दिसले. – वसंत बापट
बिजली | Bijali
₹100.00सामाजिक तत्त्वज्ञान हे जर या कवीच्या काव्याचे प्रभावी वैशिष्ट्य, तर त्या तत्त्वज्ञानाचे स्वरूप कोणते हेही लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘बिजली’ तून व्यक्त होणारी जीवनदृष्टी प्रागतिक, व्यापक आणि सहानुभूतीमय आहे. प्रत्येक युगामध्ये सामाजिक प्रगतीचे एक सूत्र अनुस्यूत असते. इष्टानिष्टतेचा शब्दकूट कोणी कितीही पाडला तरी, ग्रीष्मातील वणव्याप्रमाणे हे सूत्र स्वतःच्या आवेगानेच सतत पुढे जात राहते आणि जाताना स्थितिनिष्ठेच्या जीर्ण गढ्यांचे दहन करून टाकते. हे सूत्र ज्याच्या ध्यानात येते, केवळ ध्यानात येत नाही तर आंतरिक भावनेने जो त्याचे ग्रहण करतो, त्याच्यासंबंधीची बौद्धिक निष्ठा व श्रद्वा ज्याच्या ठिकाणी निर्माण होते असाच कवी त्या युगधर्माचा उद्गाता आणि पुढील काळाचा प्रेषित होऊ शकतो:
श्री. वसंतराव बापट यांना हे सूत्र जाणवलेले आहे. ज्या प्रकारे जाणवायला हवे त्याच प्रकारे जाणवलेले आहे म्हणजे त्यात औट घटकेची उसनवारी नाही, तर आंतरिक निष्ठेतून उत्पन्न झालेला जिव्हाळा आहे; आत्मप्रत्ययाच्या ऐरणीवरून उठलेले स्फुल्लिंग आहेत. कवी समाजक्रांतीचे पुरस्कर्ते आहेत आणि त्यातच आजच्या युगधर्माचा त्यांना साक्षात्कार झालेला आहे असे मी मानतो. प्रगतीचे मूलतत्व या दिशेवरूनच निश्चित होऊ शकते. वसंतरावांच्या काव्यामध्ये या तत्त्वज्ञानाच्या अनेक कला आपल्याला प्रकट झालेल्या दिसतात. किंबहुना त्यांच्या काव्याची प्रमुख प्रेरणा आणि त्याचे सामर्थ्य या जीवनदृष्टीमध्येच आहे.
वि. वा. शिरवाडकर (प्रस्तावनेतून)
बिजापूर डायरी | Bijapur Diary
₹200.00छत्तीसगडमधील बिजापूर जिल्हात शासकीय रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करताना डॉ. ऐश्वर्या रेवडकर यांनी तिथल्या आदिवासी जनजीवन, सकारात्मक बदलाचे जे अनुभव घेतले त्याचे हे शब्दचित्रण.
बोधाचा जोडला तारा | Bodhacha Jodala Tara
₹280.00“साहित्याची सगळ्यात मोठी ताकद त्याच्या संदिग्धतेमध्ये आहे. निसंदिग्ध, उघडं करून, सगळं स्पष्ट करून सांगणं ही साहित्याची पद्धत नाही. लेखक संदिग्धपणे सांगणार. ते प्रतीत होणं, समजणं आणि त्यात जे स्पष्टपणे म्हटलेलं नाही तेसुद्धा जाणवणं; ही प्रक्रिया वाचकांच्या मनात होणार. ती पूर्णत्वाला गेली की, त्याचा आनंद खूप मोठा असतो.”
“साहित्य आणि सामाजिक जाणीव या परस्परविरोधी गोष्टी नाहीत… सामाजिक जाणीव ही साहित्याची सहज, सुलभ अशी सहचारिणी आहे. त्यामुळे एकाच मनात त्या सुखाने नांदू शकतात. दुराग्रही, झापडबंद विचारांचं साहित्याला ओझं होतं, पण सामाजिक जाणिवेचं नाही.”
“समाज पुरेसा मोकळा, आधुनिक आणि उदारमतवादी पाहिजे; तर मग साहित्य बहरून येऊ शकतं. समाज अस्मितावादी, स्वकेंद्री, संकुचित आणि आतल्या आत बघणारा झाला, तर त्याचा साहित्यावर विपरीत परिणाम होईल.”
…मिलिंद बोकील यांच्याशी संवाद



