Angry Young Secularist | अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट
₹125.00अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहलेली १३ पत्रे आणि दलवाईंवर इतर १३ मान्यवरांनी लिहलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.
अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट (लेख संग्रह) – हमीद दलवाई यांची एक मार्मिक मुलाखत, त्यांनी वसंत नगरकरांना लिहलेली १३ पत्रे आणि दलवाईंवर इतर १३ मान्यवरांनी लिहलेले लेख आदींचा समावेश या पुस्तकात आहे.
असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
अशानं आसं व्हतं (आत्मकथनात्मक) – एका दहा – बारा वर्षांचा खेड्यातील मुलगा त्याच्या सभोवतालच्या जगाविषयी सांगतो ते अनुभव खानदेशातील तावडी बोलीत पुस्तकरूपाने प्रकाशित होत आहे.
अशी घडले मी (स्मरणचित्रे) – आचार्य जावडेकर यांच्या घरात सून म्हणून आलेल्या लीलाताईंनी त्या घरातील आठवणी ललितरम्य शैलीत सांगताना, त्या काळाच्या स्मृतीही जाग्या केल्या आहेत.
रमेश शिपूरकर पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमा या भागात समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमधे सहभागी असलेलं एक नाव. रमेशचा मृत्यू १९९५ साली झाला. तरी आजही अनेकांच्या स्मृतीत हे नाव घट्ट रुजलेलं आहे. २५ वर्षांच्या कालावधीनंतर त्यांच्या पत्नी शोभना शिपूरकर यांनी केलेलं हे लिखाण.
भारतीय प्रशासनाची ही बखर माझ्या पंचवीस वर्षांच्या प्रशासकीय वाटचालीत आलेल्या अनुभवांच्या यशापयशाच्या, चिंतनाच्या व निरीक्षणांच्या आधारे आणि प्रत्यक्ष सहभागाच्या पायावर रचलेली कहाणी आहे. टिकाकारांनी काहीही भाष्य केले तरी, प्रशासनाचा पेला पुरता रिकामा नाही आणि जनतेच्या व लोकप्रतिनिधींच्या अपेक्षेप्रमाणे पुरता भरलेलाही नाही, हे अधोरेखित करण्याचा हा प्रयत्न आहे. भारतीय प्रशासन गतिमान व डायनॅमिक आहे पण त्यात काम करणारे प्रशासक ते कारकून तुमच्या-माझ्या सारखीच माणसे आहेत. त्यामुळे प्रशासन हा मूलतः मानवी व्यापार आहे, तो मी ललित अंगाने मांडला आहे, म्हणून ‘बखर’ हा शब्द वापरला आहे.
– लक्ष्मीकांत देशमुख