Balkumar Diwali Ank | बालकुमार दिवाळी अंक
₹60.00सहा विषयांचे अंतरंग उलगडून दाखवणारे सहा लेख या अंकात आहेत. त्या त्या विषयांच्या मूलभूत संकल्पना स्पष्ट करणारे आणि त्या त्या विषयांचे समाजजीवनाशी असलेले नाते उलगडून दाखवणारे हे लेख, त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींकडून लिहून घेतले आहेत. या सर्वांनी आपापल्या विषयात अध्यापन व संशोधन तर केलेले आहेच, शिवाय आपापला विषय समाजजीवनातील विविध क्षेत्रांत रुजविण्यासाठी या ना त्या प्रकारे योगदान दिलेले आहे.
Dravid Maharashtra | द्रविड महाराष्ट्र
₹60.00भाषेच्या संबंधात मराठी भाषा संस्कृत कुळातली आहे हे ठरल्यावर तिची शब्दसंपदाही पूर्णतया संस्कृत कुळातूनच सिद्ध करणे क्रमप्राप्त मानले गेले. तमिळ कुळातील शब्दभांडाराशी तिची प्राथमिक तुलनाही झाली नाही. स्थळनामांच्याही अभ्यासात नवे पाऊल पडलेले नाही. वस्तुस्थिती मात्र वेगळीच दिसते. संस्कृत कुळावरून मराठीतले जे शब्द व्युत्पादिता येत नाहीत त्यातले बहुसंख्य तमिळ असावेत. तसेच मराठी मुलुखातील बहुसंख्य स्थळनामांचा संस्कृत, प्राकृत, कानडी वा तेलुगू भाषांवरून अर्थ लागत नाही; तमिळवरून मात्र लागतो. खास महाराष्ट्राची म्हणून मानली गेलेली खंडोबा-विठोबासारखी महादैवते किंवा बोलाई-फिरंगाईसारखी लोकदैवते यांचाही इतिहास आणि अर्थ आपल्याला तमिळ आदिसाहित्यावरून चांगला उमगू शकतो. त्यामुळे, महाराष्ट्रादी नावांचे मूळ तमिळमध्ये शोधण्यास सबळ कारण आहे
Pariwartnache Don Paik | परिवर्तनाचे दोन पाईक
₹60.00आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.
Ek Maifal | एक मैफल
₹60.00ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्ये करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रांत ही काहीशी दुर्मिळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यिेत्त्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.
Sadhana Balkumar Diwali 2023 | साधना बालकुमार दिवाळी 2023
₹60.00अनुक्रमणिका
1. भाषा म्हणजे काय? – गणेश देवी
शब्दांचे सर्वांत मोठे शस्त्र म्हणजे प्रश्न
2. इतिहास म्हणजे काय? – राजा दीक्षित
इतिहासाची साक्षरता वाढली की सामाजिक तेढ कमी होईल!
3. गणित म्हणजे काय ? – बालमोहन लिमये
तर्कशुद्ध विचार हाच गणिताचा मानबिंदू आहे!
4. विज्ञान म्हणजे काय ? – विवेक सावंत
कार्यामागचे कारण शोधणे हा विज्ञानाच्या अभ्यासाचा प्रारंभ असतो…
5. राज्यशास्त्र म्हणजे काय ? – सुहास पळशीकर
लोकशाही का हवी, हे समजून घेण्यासाठी राज्यशास्त्राचा अभ्यास करावा लागतो.
6. अर्थशास्त्र म्हणजे काय ? – नीरज हातेकर
अर्थव्यवस्था म्हणजे देवाण-चैवाणीचे जगभर पसरलेले जाळे’
Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत
₹60.00कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.
Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका
₹60.00१४ डिसेंबर १९४७ ते ४ जानेवारी २०२३ असे ७५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. १९९४ नंतरच्या २८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.