Shop

Saleनवी पुस्तके

साने गुरुजींची जीवनगाथा | Sane Gurujinchi Jeevangatha

640.00

पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजी यांना 24 डिसेंबर 1899 ते 11 जून 1950 असे जेमतेम पन्नास वर्षांचे आयुष्य लाभले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक आयाम होते; पण, कवी, लेखक, अनुवादक, संपादक, समाजसुधारक आणि स्वातंत्र्यलढ्यातील नेते अशी त्यांची सप्तरंगी ओळख अधिक गडद आहे. त्यांनी लिहिलेली लहान-मोठी अशी सव्वाशे पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, त्यातील अर्ध्याहून अधिक पुस्तके आजच्या समाजमनाचाही ठाव घेणारी आहेत. साने गुरुजींच्या व्यक्तित्वाचे व कार्याचे वर्णन करण्यासाठी अनेक विशेषणे वापरता येतील, पण त्यांच्या केवळ साहित्याचा विचार करता ‘मानवी संस्कृतीचा सर्वश्रेष्ठ मराठी प्रवक्ता’ हे संबोधन अधिक योग्य ठरेल. अशा या गुरुजींची चरित्रे अनेक लहान-थोरांनी लिहिलेली आहेत, मात्र त्यांचे समग्र म्हणावे असे हे एकमेव चरित्र आहे. त्यांच्या धडपडणाऱ्या मुलांपैकी एक असलेले राजा मंगळवेढेकर यांनी हे लिहिले आहे. कुमार व युवा अवस्थेत त्यांना गुरुजींचा सहवास लाभला आणि त्यानंतरचे अर्धशतक त्यांनी गुरुजींचेच विचार-कार्य पुढे चालू ठेवले. गुरुजींच्या विचार-कार्याचा गाभा व आवाका समजून घेण्यासाठी फक्त एकच पुस्तक वाचायचे असेल तर ते कोणते, या प्रश्नाचे उत्तर ‘साने गुरुजींची जीवनगाथा’ हेच आहे.

     

परिवर्तनाचे दोन पाईक | Pariwartnache Don Paik

60.00

आजच्या विषयाचे मी दोन विभाग पाडणार आहे. विषयाची मांडणी मी अशी करू इच्छितो की, ज्या महत्त्वाच्या संकल्पना आमच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय जीवनामध्ये आहेत, त्या प्रत्येक संकल्पनेबद्दल न्या. रानड्यांचे विचार आणि फुल्यांचे विचार यांचा तौलनिक दृष्टीने परामर्श पहिल्या व्याख्यानात घ्यावा. आणि दुसऱ्या दिवशी आजच्या सामाजिक समस्यांच्या संदर्भात न्या. रानडे आणि जोतिबा फुले यांची संबद्धता काय आहे हे तपासून पाहावे. जोतिबा फुले आणि न्या. रानडे यांच्या विचारांची वर्तुळे काही ठिकाणी एकमेकांना स्पर्श करतात, तर काही ठिकाणी एकमेकांना छेद देतात. माझ्या व्याख्यानांमध्ये हे स्पर्शबिंदू आणि छेदबिंदू या दोहोंचाही मी विचार करणार आहे.

 

     

वेध अंतर्वेध | Vedh Antarvedh

240.00
प्रतिभावान लेखकांची नानाविध रंगांची उधळण करणारी आणि सुगंध दरवळणारी तजेलदार साहित्यसुमने माझ्या परडीत नाहीत. या लेखसंग्रहात आहेत त्या फक्त सामाजिक, राजकीय, आर्थिक, संसदीय, तत्त्वज्ञानविषयक, भारतीय घटनासंबंधित आणि वैज्ञानिक समस्यांची मीमांसा करणाऱ्या लेखांच्या शुष्क समिधा! या पुस्तकाच्या सुरुवातीच्या भागात राजकारण, समाजकारण, अर्थशास्त्र, विज्ञानशास्त्र, साहित्य, कला इत्यादी क्षेत्रांतील परिवर्तनाच्या आणि उपक्रमशीलतेच्या प्रक्रियेत मोठा सहभाग असलेल्या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेतलेला आढळेल, तर दुसऱ्या भागात विविध वैचारिक समस्यांबाबतच्या माझ्या अंतर्वेधाचे प्रतिबिंब उमटलेले दिसेल. गेली अनेक वर्षे मी केलेले लिखाण म्हणजे निरनिराळ्या क्षेत्रांत निर्माण झालेल्या नव्या नव्या वैचारिक आव्हानांना दिलेला प्रतिसाद आहे. या वास्तवाचा प्रत्यय वाचकांना प्रस्तुत लेखसंग्रहात येईल.

 

   

Saleनवी पुस्तके

विकास गीते | Vikas Geete

80.00

आज मराठीमध्ये हेतूपूर्वक लिहिलेल्या स्फूर्तिगीतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे ‘मनोविकास’ ह्या सूत्राभोवती लिहिली गेलेली गाणी एकत्रितपणे उपलब्ध करणे हे महत्त्वाचे आहे. वेधगीतांमधून विवेकवादी विचार, विस्तारित भावना आणि विधायक वर्तन हा मनआरोग्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचू शकतो. मी संगीताचे पद्धतशीर प्रशिक्षण घेतलेले नाही, याचा मला एक फायदा असा झाला की, त्यामुळे चाली अगदी सोप्या बांधल्या गेल्या. माझे संगीतशिक्षण सुरू असते ते ‘कानसेन’ म्हणूनच. पण, ह्या क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार-संगीत नियोजक, माझे मित्र-मैत्रिणी असल्यामुळे त्यांचा कलाप्रवास मी जवळून अनुभवतो आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो.

     

Saleनवी पुस्तके

एक मैफल | Ek Maifal

60.00

ग्वाल्हेर घराण्याची प्रख्यात गायिका म्हणून विदुषी नीला भागवत यांची भारतात व परदेशातही ओळख आहे. सुरुवातीला, संगीताच्या जोडीने त्यांनी नृत्य, नाट्य, या कलेच्या प्रांतात, तसेच मराठी साहित्य व समाजशास्त्राचा अभ्यास व काही काळ प्राध्यापकी अशी विविध क्षेत्रांत मुशाफिरी केली. पण पुढील टप्प्यांत संगीत हेच त्यांच्या जीवनाचं श्रेयस व प्रेयस बनलं असं दिसतं. एक प्रयोगशील, अनवट वाटा धुंडाळणारी गायिका, आपली डावी विचारसरणी व स्त्रीवादी भूमिका आपल्या गायन कलेतूनही सुस्पष्टपणे व्यक्त करणारी सर्जनशील कलाकार, अशी त्यांची प्रतिमा भारतात व परदेशांतही आहे. संगीत क्षेत्रात ही काहीशी दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल. अशा समाजाभिमुख कलाकार व्यक्तित्वाचा वेध घेणं म्हणजे तिच्या जडणघडणीचा काळ व अवकाश यातील ताणे-बाणे समजून घेणं होय.

 

Saleनवी पुस्तके

पक्षी उन्हाचा – सात विद्यापीठांच्या आवारात | Pakshi Unhacha – Sat Vidyapithanchya Aawarat

300.00

विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक आणि प्रशासक या पाच प्रकारच्या भूमिका निभावताना डॉ. राजन हर्षे यांनी पुणे, जेएनयू (दिल्ली), सियान्स पो (पॅरिस), कोलंबिया (न्यू यॉर्क), हैदराबाद, अलाहाबाद आणि एसएयू (दिल्ली) या सात विद्यापीठांच्या आवारात मुशाफिरी केली आहे. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून समाज परिवर्तन हा ध्येयवाद त्या सर्व भूमिकांना जोडणारा दुवा होता. तब्बल पाच दशकांच्या त्या प्रवासाचे एका जिप्सी वृत्तीने केलेले हे आत्मनिरीक्षण व आत्मपरीक्षण आहे. या पुस्तकात बारा दीर्घ लेख आहेत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टीकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाज जीवनावर भाष्य हे चार घटक या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. त्यामुळे हे पुस्तक आत्मकथनात्मक वाटेल, प्रत्यक्षात हे एक प्रकारचे कार्यकथन आहे. मोठ्या निष्ठेने व सचोटीने कार्यरत राहताना, परिपूर्णतेचा ध्यास कसा बाळगता येतो आणि उपलब्ध अवकाशात किती परिणामकारक काम करता येते, याचे प्रतिबिंब या पुस्तकात दिसेल.

 

       

Saptahik Sadhana Diwali 2023 | साप्ताहिक साधना दिवाळी 2023

140.00

अनुक्रम

विभाग १

१ ‘श्यामची आई’चे दिग्दर्शन करताना । सुजय डहाके

२ ‘श्यामची आईची पटकथा लिहिताना । सुनील सुकथनकर

३ ‘श्यामची आई’ मध्ये छोटा श्याम साकारताना । शर्व गाडगीळ

 

विभाग २

दोन शास्त्रीय गायकांवर तीन मुलाखती

१ कुमार स्वर एक गंधर्व कथा’ साठी लेखन करताना

– माधुरी पुरंदरे –

२ कुमार स्वर एक गंधर्व कथा साठी चित्रे काढताना

चंद्रमोहन कुलकर्णी

१३ शास्त्रीय गायन हेच क्षेत्रं ठरलं, त्यापूर्वीची मी…

नीला भागवत

 

विभाग ३

दोन मुलाखती। एक शेतकऱ्याची, एक तळेकऱ्याची

१ तलाव संवर्धनाची चळवळ जगभर न्यायची आहे!

• आनंद मल्लीगवाड

२ ‘सह्याद्री फार्म्स’: शेती क्षेत्रातील कोंडी फोडण्याचा एक मार्ग

– विलास शिंदे

 

विभाग ४

संकीर्ण प्रकारातील चार लेख

अवकाशाची दृश्यात्मकता । अमोल पालेकर

घाशीराम व अंताजीची, भेट! | अतुल देऊळगावकर

बालपणीचं पुणं । राजन अन्वर

एक्स्प्रेस पुराण: पहिला अध्याय । विनय हर्डीकर

 

   

1 3 4 5 28