Shop

Saleनवी पुस्तके

Vidnyanane Mala Kay Dile | विज्ञानाने मला काय दिले

80.00

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारकार्यातून अंनिसची चतुःसूत्री आकाराला आली होती. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार करणे, कालसुसंगत धर्मचिकित्सा करणे आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. त्यातील दुसरे सूत्र समोर ठेवून, डॉ. दाभोलकर यांच्या सातव्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने ‘विज्ञानाने मला काय दिले?’ या विषयावर साधना साप्ताहिकाचा विशेषांक काढला होता, त्याचेच हे पुस्तकरूप आहे.

       

 

७८ मुलाखतींची पुस्तके | 78 Mulakhatinchi Pustake

900.00

आम्हा घरी धन 

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे साहित्य पुरस्कारप्राप्त २२ व्यक्ती व त्या पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची एक अशा एकूण २३ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या मुलाखतींचा संग्रह)

 

देव तेथेचि जाणावा

– संपादन : विनोद शिरसाठ

(महाराष्ट्र फाउंडेशनचे समाजकार्य पुरस्कारप्राप्त २५ व्यक्तींच्या विविध मान्यवरांनी घेतलेल्या २५ मुलाखतींचा संग्रह)

 

धर्मरेषा ओलांडताना

– संवादक : हिनाकौसर खान

(आंतरधर्मीय विवाह केलेल्या १५ जोडप्यांच्या हिनाकौसर खान यांनी घेतलेल्या १५ मुलाखतींचा संग्रह)

 

केशवरावांच्या मुलाखती

– विनोद शिरसाठ

(दीडशे वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या केशवरावांच्या डेक्कन कॉलेज परिसरात भल्या पहाटे घेतलेल्या ११ मुलाखतीचा संग्रह)

 

तीन संपादकांच्या मुलाखती

– संवादक : संकल्प गुर्जर व जायली वाव्हळ

– अनुवाद :  प्रभाकर पानवलकर व सुहास पाटील

(इंग्रजी पत्रकारितेतील एन. राम, शेखर गुप्ता व नरेश फर्नांडिस या तीन पिढ्यांतील तीन मोठ्या संपादकांच्या मुलाखतींचा संग्रह)

 

भारत सासणे यांची मुलाखत

– संवादक : दासू वैद्य

(उदगीर येथे झालेल्या अ.भा.म. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष भारत सासणे यांची त्या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर घेतलेली दीर्घ मुलाखत)

Saleनवी पुस्तके

Dharmaresha Olandatana | धर्मरेषा ओलांडताना

240.00
या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. या मुलाखतीमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह असले तरी व्यावहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबियांशी, सभोवतालाशी त्यांनी कशापद्धतीनं जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजूती काय होत्या, त्या मोडल्या अगर त्यात नवी भर पडली, या तऱ्हेच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध वा आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्ष आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणारं संचित अमूल्य आहे. माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे.

 

   

 

Saleनवी पुस्तके

Asidhara | असिधारा

160.00

केशव ऊर्फ बंडू गोरे,समाजवादी विचाराचे क्रांतिकारक, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग, जातीयवाद आणि भांडवलशाही यांच्याविरोधात निकराचा लढा, समाजवादी पक्षाचे संघटन मंत्री, आंतरराष्ट्रीय समाजवादाचे अभ्यासक, म्युनिसिपल कामगार संघाची स्थापना करण्यात पुढाकार, खेळ, कला, वक्तृत्व, संगीत, साहित्य यांचा दांडगा व्यासंग, कबड्डी, खो खो, ब्रिज, बुद्धिबळ या खेळांमध्ये रुची, निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत भटकंती करण्याचा, फोटो काढण्याचा छंद.

आजच्या भाषेत, केशव गोरे यांचा हा ‘बायोडेटा’. पण बायोडेटामध्ये मावणारं हे व्यक्तिमत्त्व नव्हतंच. भावनाशीलता, उत्साह, पराकोटीची जिद्द आणि चिकाटी यांचा त्यांच्याकडे अक्षय साठा होता. आपली तत्त्वं आणि व्यवहार यांची फारकत होऊ द्यायची नाही हे व्रत त्यांनी अंगीकारलं होतं. राजकीय घटना आणि सामाजिक अभिसरण यांची त्यांना योग्य जाण होती.

केशव गोरे यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांचा स्मृतिग्रंथ प्रसिद्ध केला. केशव गोरे या व्यक्तीबरोबरच समाजवादी चळवळीच्या संदर्भात एका संपूर्ण काळाचं ते दस्तावेजीकरण होतं. हा दुर्मिळ स्मृतिग्रंथ पुन्हा एकदा नव्या आवृत्तीच्या रूपात वाचकांसमोर येतो आहे….

.

 

Saleनवी पुस्तके

Bharat Sasne Yanchi Mulakhat | भारत सासणे यांची मुलाखत

60.00

कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य आणि अनुवाद इत्यादी प्रकारांत अत्यंत दर्जेदार व वैशिष्ट्यपूर्ण असे लेखन करणारे भारत सासणे मराठीतील विशेष महत्त्वाचे साहित्यिक मानले जातात. २०२२ मध्ये उदगीर (जिल्हा लातूर) येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्या संमेलनाच्या निमित्ताने त्यांची दीर्घ मुलाखत दासू वैद्य यांनी घेतली, त्या मुलाखतीचे हे पुस्तक आहे. शिवाय यात परिशिष्ट म्हणून सासणे यांचे दोन लेख समाविष्ट केले आहेत. दासू वैद्य यांची ओळख मराठीतील आघाडीचे कवी अशी आहे, मात्र त्यांनी त्यांचा एम. फील.चा प्रबंध ‘भारत सासणे यांच्या कथा’ या विषयावर लिहिला, तर पीएच.डी.चा प्रबंध ‘भारत सासणे यांचे साहित्य’ या विषयावर लिहिला आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या मुलाखतीचे मोल विशेष आहे.

 

Saleनवी पुस्तके

Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका

60.00

१४ डिसेंबर १९४७ ते ४ जानेवारी २०२३ असे ७५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म  महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. १९९४ नंतरच्या २८ वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.

 

     

Saleनवी पुस्तके

Keshavaravanchya Mulakhati | केशवरावांच्या मुलाखती

75.00

६ जानेवारी २०२० रोजी पुणे येथील डेक्कन कॉलेजच्या स्थापनेचे २०० वे वर्ष सुरू झाले. त्या दिवशी भल्या पहाटे मी डेक्कन कॉलेज परिसरात फिरायला गेलो. तेव्हा १५० वर्षांहून अधिक वयाचे केशवराव भेटले, अगदी अनपेक्षितपणे. तेव्हा त्यांच्याशी झालेला संवाद मुलाखतीच्या स्वरूपात नंतरच्या साधना साप्ताहिकाच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यानंतरच्या दोन वर्षांच्या काळात केशवरावांच्या आणखी दहा मुलाखती झाल्या, त्याच ठिकाणी आणि त्याच वेळी ! केशवरावांच्या मुलाखती पूर्वनियोजित नव्हत्या, पण बहुतांश मुलाखती कोणता तरी एखादा विषय केंद्रस्थानी ठेवूनच झाल्या. तरुणाई, पत्रकारिता, आरक्षण, उदारीकरण पर्व, वर्ल्ड हॅपिनेस रिपोर्ट, शिक्षण, असंसदीय भाषा, न्यायव्यवस्था, काँग्रेस-भाजप, निवडणूक आयोग इत्यादी.

केशवराव मुळात कमी बोलतात, संक्षिप्त उत्तरे देतात, त्यात प्रतिप्रश्नच जास्त असतात. त्या उत्तरात किंचितसा उपरोध असतो, तिरकसपणा असतो आणि समाज जीवनातील विसंगतीवर बोट ठेवून मर्मभेदी भाष्यही असते. मात्र प्रत्येक मुलाखत रंगात आली असतानाच, ‘चला, उशीर झालाय, निघतो मी’ या वाक्याने समारोप करतात. म्हणजे त्या शेवटच्या प्रश्नाचे उत्तर न देता निघून जातात. ते असे का करतात; त्यांना त्या प्रश्नाचे उत्तर देणे सोयीचे वाटत नाही, की देताच येत नाही ?

 

     

Saleनवी पुस्तके

Tin Sampadakanchya Mulakhati | तीन संपादकांच्या मुलाखती

70.00

एन. राम सांगत आहेत १४५ वर्षांची परंपरा असलेल्या ‘द हिंदू’ या दैनिकाच्या वाटचालीबद्दल.

शेखर गुप्ता सांगत आहेत ‘द इंडियन एक्सप्रेस’, ‘इंडिया टुडे’ आणि ‘द प्रिंट’ येथील स्वतःच्या कारकिर्दीबद्दल.

नरेश फर्नांडिस सांगत आहेत ‘स्क्रोल’ या डिजिटल पोर्टलवरील संपादनाबाबत….

हे तिन्ही संपादक इंग्रजी पत्रकारितेत आहेत, देशाच्या तीन टोकांवरील तीन महानगरांत (चेन्नई, दिल्ली, मुंबई) राहून तिघांनी पत्रकारिता केली आहे. तिघे तीन वेगवेगळ्या पिढ्यांतील आहेत, तिघांनीही पूर्णतः वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम केले आहे, तिघांच्याही दृष्टिकोनांत फरक आहे, तिघांनीही पत्रकारिता गांभीर्याने केलेली आहे आणि तिघांचीही पत्रकारितेच्या मूल्यांशी असलेली बांधिलकी पक्की आहे.

 

1 4 5 6 26