असेही विद्वान | Asehi Vidwan
₹120.00असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.
Eka Shabdacha Pech – Marathi Bhasantarkarache Tipan । एका शब्दाचा पेच – मराठी भाषांतरकाराचे टिपण
₹65.00अ. के. भागवत आणि ग. प्र. प्रधान यांनी 1956 मध्ये लिहिलेल्या लोकमान्य टिळकांच्या इंग्रजी चरित्राचं मराठी भाषांतर करण्याचं काम सदर भाषांतरकाराकडे आलं. भाषांतर करताना काही विशिष्ट शब्दांवर अधिक रेंगाळणं होतं. परक्या भाषेतल्या या काही शब्दांसाठी आपल्या भाषेत काही रूढ शब्द असतात, काही वेळा तसे शब्द नसतातही. काही वेळा असे रूढ प्रतिशब्द सहज उपलब्ध असले तरी ते पटत नाहीत, अपुरे वाटतात. अशा वेळी भाषांतरकारासमोरची गुंतागुंत वाढते. या पुस्तिकेमध्ये ही गुंतागुंत मांडली आहे.
माणूस आहे म्हणून | MANUS AAHE MHANUN
₹120.00माणसांवर आणि माणूसपणावर विश्वास असलेले मोहिब कादरी हे गेल्या दहा वर्षांपासून लक्षणीय स्वरूपाचे आत्मपर लेखन करीत आहेत. ‘माणूस आहे म्हणून’ हा त्यांचा आत्मपर लेखनाचा दुसरा संग्रह आहे.
गोष्ट मेंढा गावाची | Goshta Mendha Gavachi
₹240.00मेंढा गावाची ही गोष्ट कशासाठी सांगितली आहे? ही एवढ्यासाठीच सांगितली आहे की ज्यांना एरवी ग्रामीण-आदिवासी म्हणून संबोधले जाते ती माणसे किती शांतपणे, सभ्यपणे आणि तरीही किती निश्चयाने आपले जीवन जगत असतात ते बाकीच्यांना समजावे म्हणून. आज आपल्या खेड्यात असो वा शहरात, सर्वत्र नुसता दुराग्रह, हेकटपणा आणि असहकार भरून राहिलेला आहे. विज्ञानाने आणि तंत्रज्ञानाने प्रगती झालेली असली तरी मानवी जीवन स्वस्थ आणि सुरक्षित नाही; उलट, त्यामध्ये अधिकाधिक भय आणि असुरक्षितता दाटून राहिलेली आहे. समुदायात जगताना निरामय, आनंदी, निर्भय जीवनाचा प्रत्यय येत नाही. मात्र या गोष्टींची तहान माणसाला कायमच आहे आणि म्हणून अशा उदाहरणांचा मानवी मन सदैव वेध घेत असते. मेंढा हे असले एक उदाहरण आहे.
Savadh Aika Pudhalya Haka | सावध ऐका पुढल्या हाका
₹70.0014 डिसेंबर 1947 ते 4 जानेवारी 2023 असे 75 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या सुनील देशमुख यांचा जन्म महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला, मुंबई येथून केमिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनी पुढील पाच दशके अमेरिकेत वास्तव्य केले. उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रांत उंच भरारी घेत असतानाच ते सामाजिक जीवनात कायम सक्रिय राहिले. 1994 नंतरच्या 28 वर्षांत त्यांनी महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) मार्फत मराठी साहित्य व महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राबवली. अशा या सुनील देशमुख यांच्या वैचारिकतेचा गाभा आणि आवाका कसा होता त्याची झलक या पुस्तकातून पाहायला मिळते.