Sale

120.00

Asehi Vidwan | असेही विद्वान

असेही विद्वान (लेखसंग्रह) – १९६८ मध्ये साधना साप्ताहिकातून प्रभाकर पाध्ये यांनी त्यांना भेटलेल्या जगभरातील १०० विद्वानांच्या भेटींच्या आठवणी थोडक्यात व मार्मिक पद्धतीने सांगितल्या. त्यातील निवडक ७५ आठवणी आता पुस्तकरुपात.

     

Share

या पुस्तकातील लेखनाचे स्वरूप असे आहे की, वाचकांनी कोणतेही पान उघडावे आणि त्या-त्या व्यक्तीविषयीची आठवण वाचावी. पुस्तक सलग वाचले तरी काही हरकत नाही आणि असे मधूनच कोणतेही पान उघडून वाचले तरीही वाचनाच्या आनंदात काहीच फरक पडत नाही. वाचकांच्या सोयीसाठी भारतातील विद्वान (३३), आशियायी विद्वान (२०) व पाश्चात्त्य विद्वान (२२) असे तीन विभाग केले आहेत. पण पुस्तकात क्रमवारी लावताना मात्र तसा काहीही विचार केलेला नाही. कारण या आठवणी इतक्या विविध प्रकारच्या आहेत की, त्या सर्व काहीएक सूत्रात पकडता येणे अवघड आहे. विद्वान व्यक्तींच्या विक्षिप्तपणाचे किंवा वैशिष्ट्यपूर्ण वर्तनाचे हे प्रसंग वाचल्याने त्या-त्या विद्वानांविषयी असलेले गूढ कमी होईल; या विद्वान व्यक्तीसुद्धा मानवी भाव-भावना, इच्छा-आकांक्षा असलेल्याच आहेत हे प्रकर्षाने जाणवेल आणि असे असूनही त्यांना ज्ञानाच्या क्षेत्रात भरीव योगदान देता आले याची जाणीव होऊन आपल्या मनातील या विद्वानांविषयीचा आदर निश्चितपणे वाढेल!

Weight 0.15 kg
Dimensions 14 × 1.2 × 21.5 cm
Size

M, S

Pages

140

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Asehi Vidwan | असेही विद्वान”

Your email address will not be published.