Shop

Saleनवी पुस्तके

Amha Ghari Dhan | आम्हा घरी धन

240.00

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) या संस्थेच्या वतीने १९९४ पासून मराठी साहित्य पुरस्कार, तर १९९६ पासून महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार दर वर्षी दिले जातात. या पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख करून देणारी स्मरणिका किंवा विशेषांक दर वर्षी प्रसिद्ध होत आले आहेत. मात्र २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या काळात दर वर्षी पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या मुलाखती असलेले अंक साधना साप्ताहिकाने प्रकाशित केले. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन, स्वतःच्या कार्यक्षेत्रावर दृष्टिक्षेप आणि आजच्या समाजजीवनावर भाष्य ही चतुःसूत्री समोर ठेवून या मुलाखती घेण्यात आल्या होत्या.

त्या पाच वर्षात साहित्य विभागात दर वर्षी चार किंवा पाच पुरस्कार दिले गेले. त्यामध्ये साहित्य जीवनगौरव, ललित ग्रंथ पुरस्कार, वैचारिक ग्रंथ पुरस्कार, अपारंपरिक ग्रंथ पुरस्कार, नाट्यलेखन पुरस्कार आणि विशेष ग्रंथ पुरस्कार किंवा पुरस्कार अशी वर्गवारी केलेली होती. त्या पाच वर्षांतील साहित्य पुरस्कारप्राप्त सर्व म्हणजे एकूण २२ व्यक्तींच्या मुलाखतींचे संकलन असलेले हे पुस्तक आहे.

 

       

Saleनवी पुस्तके

Shastriji | शास्त्रीजी

160.00

‘प्रकांड पंडित’ हे विशेषण विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील विचारवंतांच्या संदर्भात वापरायचे असेल तर जी काही नावे पटकन समोर येतात, त्यामध्ये तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे नाव हमखास असतेच! २७ जानेवारी १९०१ ते २७ मे १९९४ असे ९३ वर्षांचे आयुष्य त्यांना लाभले. संस्कृत भाषा व साहित्य यातील त्यांची विद्वता विशेष उल्लेखनीय आणि धर्म, संस्कृती, साहित्य, तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी केलेले अभ्यास-संशोधन व लेखन पायाभूत मानले जाते.

अशा या शास्त्रीजींच्या साथीत व संगतीत वाई येथे जवळपास दोन दशके वावरलेल्या रा. ग. जाधव यांनी लिहिलेले हे पुस्तक आहे. शिवाय, रा. ग. जाधव हे मराठीतील नामवंत साहित्य समीक्षक म्हणून ओळखले जातात, त्यामुळे त्यांनी शास्त्रीजींचे कार्य आणि कर्तृत्व ज्या रसिकतेने व विश्लेषक बुद्धीने रेखाटले आहे त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

 

   

Saleनवी पुस्तके

Jivanashi Sanvad | जीवनाशी संवाद

240.00

२१ जानेवारी १९२४ ते १२ नोव्हेंबर २००५ असे ८१ वर्षांचे आयुष्य लाभलेले मधु दंडवते यांनी विद्यार्थीदशेत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभाग घेतला होता. नंतर भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांनी दोन दशकांहून अधिक काळ काम केले. स्वातंत्र्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते म्हणून काम करताना त्यांनी पुढील दोन दशकांत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला. नंतर १९७५ ते ७७ या राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला.

१९७१ ते ९१ या काळात कोकणातील राजापूर लोकसभा मतदारसंघातून सलग पाच वेळा ते निवडून आले आणि उत्तम संसदपटू म्हणून त्यांची ख्याती झाली. त्याच दरम्यान त्यांनी मोरारजी देसाई मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री म्हणून तर व्ही.पी. सिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून काम केले. देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल पंतप्रधान असताना, म्हणजे १९९६ ते ९८ या काळात ते केंद्रीय नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष होते. मराठी व इंग्रजीत मिळून डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील ‘डायलॉग विथ लाइफ’ या आत्मकथनात्मक व कार्यकथनात्मक म्हणता येईल अशा इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे.

 

   

हमीद दलवाईंंची पुस्तके| Hamid Dalawainchi pustake

700.00

इस्लामचे भारतीय चित्र

कानोसा : भारतातील मुस्लीम मनाचा

भारतातील मुस्लीम राजकारण

अँँग्री यंग सेक्युलॅॅरीस्ट

राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान

जमिला जावद आणि इतर कथा

 

Saleनवी पुस्तके

Bharatiya Sanskruti | भारतीय संस्कृती

200.00
एका सामान्य माणसाने सामान्य जनांकरिता लिहिलेले हे पुस्तक आहे. या पुस्तकात पांडित्य नाही, विद्वत्ता नाही. शेकडो ग्रंथांतील आधार व संदर्भवचने वगैरे येथे काहीएक नाही. येथे प्राच्यविद्याविशारदत्व नाही, गहनगंभीर गूढ असे काही नाही. या पुस्तकात एक विशिष्ट दृष्टी मात्र आहे. यात भारतीय संस्कृतीचा इतिहास नाही. कलाक्षेत्रात वा ज्ञानविज्ञानाच्या प्रांतात, व्यापारात वा राजकारणात आम्ही कसे पुढारलेले होतो, त्याची माहिती येथे नाही. चंद्रगुप्त व अशोक, कालिदास व तानसेन, आर्यभट्ट व भास्कराचार्य यांचे अभिनव इतिहास येथे नाहीत. भारतीय संस्कृतीच्या आत्म्याची येथे भेट आहे. तिच्या अंतरंगाचे येथे दर्शन आहे.भारतीय संस्कृतीच्या गाभाऱ्यात प्रवेश आहे.
– साने गुरुजी

         

Chikhalache Pay | चिखलाचे पाय

100.00

डॉ. दिलीप शिंदे यांनी या पुस्तकात त्यांना वृद्धाश्रमात भेटलेल्या तेरा व्यक्तींची अनुभवचित्रे शब्दबद्ध केली आहेत. डॉ. शिंदे यांची लेखनशैली प्रवाही, प्रासादिक आहे. त्याचबरोबर त्यांच्या वृत्तीतील संवेदनशीलता अधिक भावणारी आहे. त्यांच्या स्वतःच्या प्रवृत्तीत ‘वृद्धाश्रम पासून ते ‘वृद्धाश्रमांची अपरिहार्यता’पर्यंत झालेली स्थित्यंतरे त्यांनी प्रामाणिक थेटपणाने नोंदवली आहेत. प्रत्येक अनुभवचित्र हे एक कथेचा घाट घेऊन येते. त्यामुळे ती वाचनीय आहेत. या पुस्तकाचा इत्यर्थ डॉ. शिंदे यांनी समारोपात अब्राहम हेशेल यांच्या एका वाक्यातून सांगितला आहे. जग बदलते आहे. विज्ञाननिष्ठ, व्यवहारनिष्ठ होत आहे. हे सगळे खरे असले तरी एक महत्त्वाची जाणीव अब्राहम यांच्या शब्दात… “जगाला आपली प्रगती साधण्यासाठी ज्ञान-विज्ञानाप्रमाणेच प्रेमाची व मानवतेचीही गरज आहे.” हे भानच या लेखनामागची आणि आत्मीय कार्यामागची खरी प्रेरणा आहे.

– प्रा. डॉ. तारा भवाळकर

     

Nivadak Balkumar Sadhana | निवडक बालकुमार साधना

280.00

साधनाने हीरकमहोत्सवी म्हणजे साठाव्या वर्षात बालकुमारांसाठी स्वतंत्र दिवाळी अंक काढायला सुरुवात केली आणि गेली दहा वर्षे त्यात कमालीचे सातत्य ठेवले आहे. या दहा दिवाळी अंकांमध्ये ७३ गोष्टी/लेख प्रसिद्ध झाले, त्यातील निवडक ३६ लेखांचा/गोष्टींचा संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.

     

Thaiman Changalvadache| थैमान चंगळवादाचे

60.00

आधुनिक काळात बेसुमार वाढता चंगळवाद यामुळे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अधिक धोक्याची बाब म्हणजे, ही वाढती चंगळवादी प्रवृत्ती जीवन अधिकाधिक यशस्वीपणे जगण्याची खूण मानली जाऊ लागली आहे. पराकोटीची विषमता, नैसर्गिक संसाधनांची बेसुमार उधळपट्टी, फार मोठ्या अन्य मानवसमूहाबद्दल असंवेदनशीलता व बेपर्वाई यांवर ही जीवनपद्धती उभी आहे. ती पूर्णतः अविवेकी आहे. समाजसुधारकांच्या विचाराशीही संपूर्णपणे विसंगत आहे आणि अंतिमतः मानव व निसर्ग यांना घातकच आहे, विनाशाकडे नेणारी आहे. या वास्तवाचे डोळे खाडकन उघडणारे दर्शन ही पुस्तिका घडवेल आणि वाचणाऱ्या सर्वांना अंतर्मुख व कृतिप्रवण करेल असा विश्वास वाटतो.

डॉ. नरेंद्र दाभोलकर

     

1 5 6 7 26