आज सर्वसामान्य माणसाचा वैद्यकीय व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन संशयग्रस्त बनला आहे. समाजाच्या मनामध्ये या व्यवसायाबद्दल अनेक शंका आहेत, गैरसमज आहेत. हे वैद्यकीय व्यवसायाला पोषक नाही आणि समाजहिताचेही नाही. डॉक्टर, रुग्ण, नातेवाईक व समाज ह्या सर्वांनी मिळून ह्याचा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. हे पुस्तक त्या दृष्टीने जागल्याची भूमिका बजावणारे वाटते. वैद्यकीय व्यवसायाला पूर्वप्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अशा लेखनाचे आपण मनःपूर्वक स्वागत करायला हवे.
डॉ. रवी बापट
Reviews
There are no reviews yet.